R. Ashwin Test Wickets: इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विन करू शकतो महाविक्रम, कसोटीमध्ये केवळ एकाच भारतीयाने केलाय असा विक्रम.

 R. Ashwin Test Wickets: इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विन करू शकतो महाविक्रम, कसोटीमध्ये केवळ एकाच भारतीयाने केलाय असा विक्रम.

 R. Ashwin Test Wickets: भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. रविचंद्रन अश्विन एक महान विक्रम करण्याच्या जवळ आहे जो आतापर्यंत फक्त भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर आहे. गुरुवार, २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत असताना रविचंद्रन अश्विनच्या नजरा या विक्रमाकडे असतील. अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा महान विक्रम करण्यापासून फक्त 10 विकेट दूर आहे.

 

 R. Ashwin Test Wickets:अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे

37 वर्षीय अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 500 कसोटी बळी पूर्ण करणार आहे. रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 95 कसोटी सामन्यांमध्ये 490 बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विनने आणखी 10 विकेट घेतल्यास, तो कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरेल. आतापर्यंत फक्त अनिल कुंबळे भारतासाठी हा मोठा टप्पा गाठू शकला आहे. भारतासाठी, आतापर्यंत केवळ अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळेला 500 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेण्यात यश आले आहे.

 

 R. Ashwin Test Wickets:अश्विनने आतापर्यंत 490 कसोटी बळी घेतले आहेत.

 R. Ashwin Test Wickets: इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विन करू शकतो महाविक्रम, कसोटीमध्ये केवळ एकाच भारतीयाने केलाय असा विक्रम.

अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विनने भारताकडून आतापर्यंत 95 कसोटी सामन्यांमध्ये 490 विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विनने कसोटी सामन्यात 34 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय रविचंद्रन अश्विनने 8 वेळा कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत आणि हा विक्रम करण्यासाठी अश्विनला जास्तीत जास्त दोन सामने खेळावे लागतील.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

 

1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 800 कसोटी विकेट्स

 

2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708 कसोटी विकेट्स

 

3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 690 कसोटी विकेट्स

 

4. अनिल कुंबळे (भारत) – 619 कसोटी विकेट्स

 

5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 604 कसोटी विकेट्स

 

6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 कसोटी विकेट्स

 

7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 519 कसोटी विकेट्स

 

8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) – 512 कसोटी विकेट्स

 

9. रविचंद्रन अश्विन (भारत) – 490 कसोटी विकेट्स

 

10. डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) – 439 कसोटी विकेट्स


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *