इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात आर.अश्विनचे होणार संघात ‘कमबॅक’! मोहम्मद सिराज ला मिळणार विश्रांती?

विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाने विजयी पंच लगावला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ तुफान फार्मात आहे रोहित शर्मा विराट कोहली हे विरोधी संघाचे धाबे दणाणून सोडत आहेत. तर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज,मोहम्मद शमी, जडेजा व कुलदीप यादव हे आपल्या धारदार गोलंदाजीने विरोधी संघाचे मनस्वी जुळवून लावत आहेत.

भारतीय संघाचा पुढचा सामना रविवारी इंग्लंडविरुद्ध 29 सप्टेंबर रोजी लखनऊच्या मैदानावर होणार आहे. इंग्लंड पुढे भारताचे तगडे आव्हान असणार आहे. यंदाच्या स्पर्धेत इंग्लंडला नावाला लौकिक असा खेळ करता आला नाही. तसेच उद्या होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड असणार आहे. इंग्लंडने हा सामना गमावला तर त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागेल.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये भारतीय संगत काही बदल पाहायला मिळतील. हा सामना लखनऊच्या मैदानावर होणार असल्याने येथील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजास अनुकूल आहे त्यामुळे रोहित शर्मा रवींद्र जडेजा कुलदीप यादव आणि आर अश्विनी या तीन फिरकीपटू सह खेळू शकतो. रविचंद्रन अश्विनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला तर मोहम्मद शमी किंवा सिराज या दोघांनाही बेंचवर बसावे लागेल. शमीने गेल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. म्हणजेच अलीकडचा फॉर्म लक्षात घेता सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी धोकादायक ठरला आहे. मोहम्मद शमीने गेल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. तो या सामन्यात फिक्स असू शकतो. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या फिरत्या चेंडूंनीही फलंदाजांना खूप त्रास दिला आहे.

दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागील दोन सामन्यास मुकला. त्याची दुखापत ही गंभीर नसली तरी महत्त्वाच्या सामन्यासाठी पंड्या उपलब्ध राहावा यासाठी त्याची दुखापत ही पूर्ण बरी होण्यासाठी त्याला दीर्घकाळ विश्राम दिला जात आहे. इंग्लंड आणि श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये तो कदाचित उपलब्ध नसेल. मात्र तो दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिकचा पाय मुडपला होता. त्यामुळे त्याच्या पायावर सूज आली आहे. सुदैवाने त्याच्या पायाला कुठलेच फ्रॅक्चर झाले नाही.

भारताचा संभाव्य संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी/ मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.