इंग्लंडच्या गोलंदाजांना पाणी पाजणारा युवा ‘रचिन रवींद्र’च्या नावाशी आहे सचिन तेंडूलकर -राहुल द्रविडचा विशेष संबंध, वडील होते भारतात सॉफ्टवेअर इंजिनिअर..
भारतात खेळल्या जात असलेल्या ICC एकदिवसीय विश्वचषक (ICC World Cup 2023) च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी शतके झळकावून धमाका केलाय. यंदाच्या विश्वचषकात डेव्हन कॉनवे शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. विशेष म्हणजे न्यूझीलंड कडून खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रनेही शतक झळकावले आहे.
भारतीय वंशाचा रचिन हा न्यूझीलंडकडून खेळत असला तरी, दिग्गज माजी भारतीय खेळाडू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाशी त्याचा विशेष संबंध आहे. रचिनचे वडील मूळचे बेंगळुरूचे आहेत. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या रचिनच्या वडिलांनी न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.
रचिनच्या वडिलांचे आवडते क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड आहेत, म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव राहुल आणि सचिन यांच्या नावावर ठेवले. आता हाच रचिन भारतात शतक झळकावून या दिग्गजांचे लक्ष वेधून घेत आहे.
रचिन हा अष्टपैलू खेळाडू आहे जो डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि फिरकी गोलंदाजी करतो, म्हणूनच भारतात विश्वचषक खेळण्यासाठी न्यूझीलंड संघात त्याचा समावेश करण्यात आला.
पहिल्याच सामन्यात चमकला रचीन, इंग्लडच्या गोलंदाजाना दाखवला आपला क्लास..
इंग्लंडच्या दिग्गज गोलंदाजाना रचीनने भरपूर धावा काढत आपला क्लास दाखवला आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीमध्ये तिसर्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रचीनने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत मोठमोठे शॉट खेळून धावा काढण्याला प्राधान्य दिले. ज्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजाना सेट होण्यास वेळच मिळाला आणि कोनवे-रचीनच्या जोडीने सामना त्यांच्या हातून हिसकावून घेतला.
283 धावांचे लक्ष असलेला हा सामना एकतर्फी होईल असे कुणालाही वाटले नसेल मात्र न्यूझीलंडच्या या दोन युवा फलंदाजांनी हे करून दाखवले. या दोनच युवा खेळाडूंची फलंदाजी पाहता न्युझीलंड या विश्व कपमध्ये ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार ठरू शकतो.
न्यूझीलंडने आतापर्यंत एकदाही नाही जिंकली विश्वचषक ट्रॉफी!
न्यूझीलंडने वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही विश्वचषक ट्रॉफी जिंकलेली नाहीये. हे जरी खरे असले तरी मात्र गेल्या 4 विश्व चषक सामन्यामध्ये न्यूझीलंड प्रत्येक वेळी सेमीफायनलपर्यंत पोहचला आहे. यंदा त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागामध्ये शानदार कामगिरी करणारे खेळाडू सहभागी आहेत. ज्यामुळे या वर्षी विश्वचषक जिंकून आपले 48 वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण करण्याचा केन & कंपनीचा मानस असेल.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..