‘ही खरी खेळभावना…!” राहुल द्रविडने नाकारली बीसीसीआयची ही मोठी रक्कम मिळणारी विशेष ऑफर, कारण वाचून कराल कौतुक..

0

राहुल द्रविड: टीम इंडियाला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ आता संपला आहे. त्यानंतर गौतम गंभीरने नवे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले आहे. राहुलने विश्वचषकादरम्यान खेळाडूंसोबत कठोर मेहनत करून संघाला मजबूत केले. संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राहुल द्रविडला बीसीसीआयला विशेष बक्षीस द्यायचे होते, मात्र द्रविडने त्याच्या उर्वरित सहकाऱ्यांसाठी बीसीसीआयची ही ऑफर नाकारली आहे. यामुळेच आता राहुल द्रविडचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Team India Head Coach : भारतीय संघाला खरच विदेशी प्रशिक्षकाची गरज आहे का? भारतीय संघाच्या माजी खेळाडूने केला खुलासा..!

राहुल द्रविडने बीसीसीआयची ऑफर नाकारली,सर्व सहकार्यांसोबत समान वागणुकीची केली विनंती.

टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकून टीम इंडिया भारतात परतली तेव्हा बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी बीसीसीआयने संपूर्ण संघ आणि कोचिंग स्टाफला 125 कोटी रुपयांचा धनादेशही दिला होता. या 125 कोटी रुपयांपैकी प्रशिक्षक राहुल द्रविडसह संघातील खेळाडूंना 5 कोटी रुपये मिळणार होते, तर उर्वरित गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळणार होते.

बीसीसीआयची ५ कोटींची ऑफर राहुल द्रविड ने नाकारली. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, राहुल द्रविडलाही इतर प्रशिक्षकांप्रमाणेच रक्कम घ्यायची होती. बीसीसीआय त्यांच्या या  निर्णयाचा आदर करून त्यांची 5 कोटी रक्कम ही इतर प्रशिक्षकांसोबत वाटणार आहे.

'ही खरी खेळभावना...!" राहुल द्रविडने नाकारली बीसीसीआयची ही मोठी रक्कम मिळणारी विशेष ऑफर, कारण वाचून कराल कौतुक..

राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकता आले. यापूर्वी, राहुलच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, परंतु अंतिम सामन्यात संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.