दुसऱ्या कसोटीआधी मैदानावर कोच राहुल द्रविडने कर्णधार के.एल.राहुलला दिले धडे, काहीही करून राहुल फोर्मात परतने संघासाठी आवश्यक, पहा व्हिडीओ.
दुसऱ्या कसोटीआधी मैदानावर कोच राहुल द्रविडने कर्णधार के.एल.राहुलला दिले धडे, काहीही करून राहुल फोर्मात परतने संघासाठी आवश्यक, पहा व्हिडीओ.
टीम इंडिया 22 डिसेंबरपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे, केएल राहुल दुसऱ्या कसोटी सामन्यातही संघाचे नेतृत्व करेल, पण कर्णधार राहुलचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे, अशा स्थितीत राहुलचा क्लास राहुलनेलावलाआहे, तो म्हणजे, प्रशिक्षक राहुल द्रविडने सराव सत्रादरम्यान कर्णधार केएल राहुलला काही टिप्स दिल्या आहेत. ज्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
द्रविडने राहुलला टिप्स दिल्या.
भारत आणि बांगलादेश विरुद्धची दुसरी कसोटी गुरुवारपासून सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत ढाक्याच्या मैदानावर दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने घाम गाळायला सुरुवात केली आहे, कर्णधार राहुल सध्या फोर्ममध्ये नाहीये , अशा परिस्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला काही टिप्स दिल्या, जेणेकरून राहुल फॉर्ममध्ये परत येईल. ह्या टिप्स देतानाचा मैदानावरील व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

राहुलला फॉर्ममध्ये परतण्याची गरज आहे.
केएल राहुलचे फॉर्ममध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे, हे प्रशिक्षक राहुल द्रविडलाही चांगलेच ठाऊक आहे, कारण कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे जर राहुल फॉर्ममध्ये परतला, तर टीम इंडियासाठी हे खूप फायदेशीर ठरेल पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात राहुलला मोठी खेळी करता आली नाही, तर त्याची सुरुवात चांगली झाली होती. त्यामुळेच आता राहुल द्रविड स्वतः केएलसाठी मेहनत घेत आहे.
दुसरी कसोटी जिंकली पाहिजे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने पहिली टेस्ट जिंकून भारताच्या फायनल खेळण्याच्या आशा जिवंत आहेत, पण बांगलादेशविरुद्धची दुसरी टेस्ट जिंकणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा टीम इंडियाच्या फायनलमध्ये जाण्याच्या आशा मावळू शकतात. विस्कळीत अशा स्थितीत टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीसाठी सराव सुरू केला आहे.
पहा व्हिडीओ:
.@BCCI head coach Rahul Dravid was seen inspecting the pitch and giving batting tips to @klrahul ahead of the 2nd test against @BCBtigers. Watch 👇@AgeasFederal @BoriaMajumdar @debasissen @CricSubhayan #BANvIND #WTC23 pic.twitter.com/hD7ok3dShe
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) December 20, 2022