आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सच्या आर.आश्विन चे अनोखे द्विशतक: या खास क्लबमध्ये झाला सामील

राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का....! या खेळाडूने वैयक्तिक कारणामुळे घेतली आयपीएलमधून माघार.

आयपीएल 2024 मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्स संघाने सहा गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सचा स्टार क्रिकेटर आर अश्विन याने एक नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएल मध्ये 200 सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादीमध्ये तो सामील झाला आहे. 

आश्विन आयपीएलच्या इतिहासात 200 सामने खेळणारा दहावा खेळाडू बनला आहे. 37 वर्षीय या खेळाडूने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून पदार्पण केले होते अश्विन ने आतापर्यंत 200 सामन्यात 739 धावा केल्या आहेत. यासह 172 विकेट देखील घेतले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज आहे.

आयपीएल मध्ये 200 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये धोनी, रोहित आणि कोहली यांचा देखील समावेश आहे. यासह दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा शिखर धवन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा व अंबाती रायडू या खेळाडूंनी देखील आयपीएल मध्ये 200 सामने खेळले आहेत. विदेशी खेळाडूंच्या यादीमध्ये सर्वाधिक सामन्या खेळण्याचा विक्रम कायरन पोलार्ड याच्या नावे आहे. त्याने 189 सामने खेळले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने 184 सामने खेळले आहेत. आतापर्यंत एकाही विदेशी खेळाडूला आयपीएल मध्ये 200 सामने खेळता आले नाहीत.

आयपीएल मध्ये आर अश्विन ने पाच संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. सीएसके शिवाय अश्विनने रायझिंग पुणे सुपर सुपरजाएंट्स, किंग्स इलेव्हन पंजाब दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळले आहेत. राजस्थान रॉयल्स ने 2022 मध्ये त्याला आपल्या संघामध्ये घेतले. तो 2010 आणि 2011 मध्ये आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्रमुख सदस्य होता. 2018 आणि 2019 मध्ये तो पंजाब संघाचा कर्णधार देखील होता. मात्र त्याच्या नेतृ त्याने फारशी समाधानकारक कामगिरी केली नाही. त्यामुळे पंजाबने त्यांना रिलीज करून टाकले. आयपीएल मध्ये 32 सामने खेळले असून यात 27 विकेट घेतल्याची नोंद आहे. यासह राजस्थानकडून खेळताना त्याच्या नावे 287 धावांची नोंद आहे. मागील सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्याने 19 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या  आर. अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा केला. त्याने पाच सामन्यात 26 विकेट घेतले. या कसोटी मालिकेत त्याने 500 बळीचा टप्पा देखील पूर्ण केला. यासह तो मायदेशात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील झाला आहे. अश्विनने अनिल कुंबळे याला पाठीमागे टाकत नवा विक्रम केला. मायदेशात सर्वाधिक विकेट घेण्याचा अनिल कुंबळेचा विक्रम त्याने काल मोडीत काढला.

आयपीएल मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू

खेळाडूंचे नाव व सामने

महेंद्र सिंह धोनी 253

रोहित शर्मा 245

दिनेश कार्तिक 245

विराट कोहली 240

रवींद्र जडेजा 229

शिखर धवन 220

सुरेश रैना 205

रॉबिन उथप्पा 205

अंबाती रायुडू 204

रविचंद्रन अश्विन 199

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *