Ranji Trophy 2024: सचिनच्या पोराची तुफानी कामगिरी.. अर्जुन तेंडूलकरने केवळ एवढ्या चेंडूत ठोकले अर्धशतक, चौकार-षटकारांचा पाडला पाऊस; पहा व्हायरल व्हिडीओ.

Ranji Trophy 2024: सचिनच्या पोराची तुफानी कामगिरी.. अर्जुन तेंडूलकरने केवळ एवढ्या चेंडूत ठोकले अर्धशतक, चौकार-षटकारांचा पाडला पाऊस; पहा व्हायरल व्हिडीओ.

Ranji Trophy 2024:  सध्या भारतात रणजी ट्रॉफी 2024 चे सामने खेळवले जात आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठी स्पर्धा म्हणून रणजी ट्रॉफीकडे पहिले जाते. आजकाल अनेक युवा खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या अप्रतिम कामगिरीने क्रिकेटप्रेमी आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टीम इंडियाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा ‘अर्जुन तेंडुलकर’.

रणजी ट्रॉफी 2024 (Ranji Trophy 2024) मध्ये अर्जुन तेंडुलकर गोवा संघाचे नेतृत्व करत आहे. अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या फेरीत चंदीगडसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. ज्यांचे अनेक शॉट्स आता सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. अर्जुन तेंडुलकरच्या या अप्रतिम शॉट्समुळे चाहत्यांना त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांची आठवण झाली.

Ranji Trophy 2024: सचिनच्या पोराची तुफानी कामगिरी.. अर्जुन तेंडूलकरने केवळ एवढ्या चेंडूत ठोकले अर्धशतक, चौकार-षटकारांचा पाडला पाऊस; पहा व्हायरल व्हिडीओ.

 Ranji Trophy 2024: अर्जुनने चंदीगडविरुद्ध ठोकले शानदार अर्धशतक..

पहिल्या फेरीत गोव्याचा सामना त्रिपुराशी होता. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची कामगिरी काही खास नव्हती. या सामन्यात अर्जुनने फलंदाजी करताना २१ धावा आणि गोलंदाजी करताना २ बळी घेतले. दुसऱ्या फेरीत चंदीगडविरुद्ध अर्जुनची कामगिरी अप्रतिम होती.

चंदीगडविरुद्ध फलंदाजी करताना अर्जुन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्जुनने 70 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने आपल्या बॅटमधून 6 चौकार आणि 4 षटकार मारले. अर्जुन तेंडुलकरने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या खेळीचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यावर चाहते विविध प्रकारच्या कमेंट्सही करत आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना गोवा संघाने 7 गडी गमावून 618 धावा केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Tendulkar (@arjuntendulkar24)

अर्जुन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

अर्जुन तेंडुलकर अद्याप टीम इंडियासाठी डेब्यू करू शकलेला नाही. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून (MI) पदार्पण केले आहे. अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना 13 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजी करताना त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत.


हेही वाचा:

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *