Ranji Trophy: मुंबई क्रिकेट संघच रणजी क्रिकेट मधला बॉस; वाचा कोणत्या संघाने किती वेळा जिंकलाय रणजी चषक!

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Ranji Trophy:  मुंबई रणजी क्रिकेट संघाने विदर्भ संघाचा 2023-24 रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 169 धावांनी पराभव करत चषकावर नाव कोरले. मुंबई संघाने आतापर्यंत 48 वेळा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यापैकी 42 वेळा ते रणजी चषक आपल्या नावे करण्यात यशस्वी ठरले. मुंबईने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले.

देशांतर्गत होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबई वगळता इतर कोणत्याही संघाला आतापर्यंत रणजी चषक जिंकता आला नाही. चला तर जाणून घेऊया आतापर्यंत रणजी चषक कोणत्या संघाने किती वेळा जिंकला आहे ते (Ranji Trophy Winner List)

यंदाच्या रणजी सीजनमध्ये सर्वाधिक धावा काढणारे हे आहेत टॉप 5 खेळाडू; यादीत मुंबईचा एकही खेळाडू नाही!

Ranji Trophy: या संघाने जिंकलाय सर्वाधिक वेळा रणजी चषक

मुंबई रणजी क्रिकेट संघाने आतापर्यंत 42 वेळा या चषकावर नाव कोरले आहे. सर्वाधिक वेळा रणजी क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर झाला आहे.

कर्नाटक रणजी क्रिकेट संघाने आतापर्यंत आठ वेळा चषकावर आपले नाव कोरले आहे. 2015 आणि 2016 या सलग वर्षे त्यांनी रणजी चषक आपल्या नावे केला होता. रणजी चषक सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या संघांमध्ये कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे.

2008 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने शेवटचा रणजी चषक जिंकला होता. या घटनेला आता तब्बल 16 वर्ष उलटून गेले. दिल्लीने आतापर्यंत सात वेळा रणजी चषक जिंकले आहे.

बडोद्याच्या संघाने ही रणजी क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवला आहे. या संघाने पाच वेळा रणजी चषक उंचावला आहे. या संघाने 2001 मध्ये पंड्या आणि पठाण बंधूंच्या काळात शेवटचा रणजी चषक जिंकला होता.

मध्य प्रदेश रणजी क्रिकेट संघाने चार वेळा रणजी चषक जिंकून दाखविले. 2022 मध्ये या संघाला मुंबईने अंतिम सामन्यात हरवले होते.

सौराष्ट रणजी क्रिकेट संघाने आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाला रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, जयदेव उनादकट सारखे अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. या संघाने दोनदा रणजी चषक आपल्या नावे केला आहे.

विदर्भ रणजी क्रिकेट संघ 2018-2019 असे सलग दोन वर्ष रणजी चषक जिंकण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या वर्षी देखील हा संघ रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र मुंबईने अंतिम सामन्यात त्यांचा 169 धावांनी पराभव केला.

Ranji Trophy: मुंबई क्रिकेट संघच रणजी क्रिकेट मधला बॉस; वाचा कोणत्या संघाने किती वेळा जिंकलाय रणजी चषक!

बंगाल रणजी क्रिकेट संघाने दोन वेळा रणजी चषक जिंकून दाखवले. या संघाने शेवटचा रणजी चषक 1990 साली जिंकला होता. या घटनेला आता 34 वर्ष पूर्ण होऊन गेले.

राजस्थान क्रिकेट संघाने देखील 2011-12 मध्ये सलग दोन वर्ष रणजी चषक आपल्या नावे केला. त्यानंतर या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

हैदराबाद रणजी क्रिकेट संघाने 1987 मध्ये म्हणजेच जवळपास चार दशकापूर्वी शेवटचा रणजी चषक जिंकला होता. या संघाने दोन वेळा रणजी चषक जिंकण्यात यश मिळवले.

Ranji Trophy: मुंबई क्रिकेट संघच रणजी क्रिकेट मधला बॉस; वाचा कोणत्या संघाने किती वेळा जिंकलाय रणजी चषक!

महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाने दोन वेळा रणजी चषक जिंकण्यात यश मिळवले. महाराष्ट्र क्रिकेट संघाने 1941 मध्ये शेवटचा रणजी चषक जिंकला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात या संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर यांना एकदाही रणजी चषक विजयाचा दुष्काळ संपवता आला नाही.

रेल्वे रणजी क्रिकेट संघाने देखील दोनदा रणजी चषकावर आपले नाव कोरले होते. 2002 आणि 2005 मध्ये या संघाने रणजी चषक आपल्या नावे केला होता.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.