अफगानिस्तान संघाचा फिरकीपटू राशिद खान ( Rashid Khan) हा सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावे टी -२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. नुकताच त्याने टी -२० क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. राशिदने टी -२० क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करत इतिहासाला गवसणी घातली आहे. असा कारनामा करणारा तो डवेन ब्रावोनंतर दुसराच गोलंदाज ठरला आहे.
राशिदने सुंदर न्यूलँड्स स्टेडियमवर एमआय केपटाऊन आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या टी -२० सामन्यात हा ऐतिहासिक कारनामा केला आहे. एमआय केपटाऊन संघाचे नेतृत्व करत असलेल्या राशिद खानने गोलंदाजी करताना केवळ १६ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.
टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज..
डवेन ब्रावो – ६१४ विकेट्स (५२६ डाव)
राशिद खान – ५०० विकेट्स (३६८ डाव)
सुनील नरेन – ४७४ विकेट्स (४२७ डाव)
इम्रान ताहिर – ४६६ विकेट्स (३५८ डाव)
शकिब अल हसन – ४३६ विकेट्स (३८२ डाव)
राशिदने सिल्ड फोर्टुइनला बाद करत हा कारनामा केला. सिल्डने या डावात १४ चेंडूंमध्ये ११ धावांची खेळी केली. तसेच त्याने आपल्या स्पेल दरम्यान कुसल मेंडिस आणि रिले रूसोवला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.