- Advertisement -

या कारणामुळे मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरलेत,कारण आहे खूपच इमोशनल..

0 0

या कारणामुळे मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरलेत,कारण आहे खूपच इमोशनल..


आयपीएल 2023 सध्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे. आजचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळला गेला आणि राजस्थानने ७२ धावांनी हैद्राबादचा पराभव केला. आजच्या सुपर रविवार मधील दुसरा सामना बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रोयल चेलेंजर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सध्या खेळवला जात आहे.

नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार फाफ डूप्लेसीसने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे सलामीवीर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरले तेव्हा त्याच्या दंडावर काळी पट्टी बांधलेली दिसली.त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला कि मुंबईचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का खेळतायेत?

मुंबई इंडियन्स

या कारणामुळे मुंबईचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरलेत.

खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधण्याचे कारण म्हणजे माजी भारतीय क्रिकेटपटू ‘सलीम दुराणी’ यांचे आज सकाळी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्याना श्रद्धांजली म्हणून सर्वच खेळाडू काळी पट्टी बांधून खेळत आहेत.

या आधीच्या सामन्यात सुद्धा राजस्थान रॉयल्स आणि सनराईजर्स हैद्राबादचे खेळाडू सुद्धा दंडावर काळी पट्टी बांधून खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. दिग्गज माजी क्रिकेटर सलीम दुराणी यांना श्रद्धांजली म्हणून सर्वच खेळाडूंनी आज काळी पट्टी दंडावर बांधून खेळत आहेत.

बीसीसीआयने सुद्धा सलीम दुराणी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारी  पोस्ट केली. भगवान त्यांच्या आत्म्यास शांती देओ. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघाने अनेक चांगले खेळाडू घडले होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या घरातील सदस्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.  या दुखाच्या काळात आम्ही सर्वच त्यांच्या दुखात सहभागी आहोत,असेही बीसीसीआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा:

भारतीय क्रिकेट संघात हे ३ खेळाडू आहेत सर्वात घमंडी, चक्क एकाने तर केला होता हा प्रकार. 

Leave A Reply

Your email address will not be published.