“अश्विन अन्ना अंगार है” आधी लाबुसेनला केले पायचीत नंतर फलंदाजीस आलेल्या ‘स्टीव्ह स्मिथ’ला अश्विनने दुसऱ्याच चेंडूवर केले बाद, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून दिल्लीमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रोलीया कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी दुसरी कसोटी तिथून सुरू केली आहे जिथे त्यांनी पहिली कसोटी संपवली होती. दिल्लीतही कांगारू फलंदाज भारतीय फिरकीपटूंच्या फिरकीवर नाचताना दिसताहेत. आर अश्विनने आधी लबुशेनला पॅव्हेलियन पाठवले आणि नंतर क्रिझवर आलेल्या स्टीव्ह स्मिथला सुद्धा दुसऱ्याच चेंडूवर बाद करत पव्हेलीयनमध्ये पाठवले.

स्टीव्ह स्मिथ फलंदाजीस येताच बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूशी अश्विनने केलेली छेडछाड स्मिथला चांगलीच महागात पडली. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट यष्टिरक्षक केएस भरतच्या हातात गेला. त्यामुळे अवघे दोन चेंडू खेळून स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतला. स्मिथची विकेट पडल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ दडपणाखाली आला आहे.
त्या स्मिथला पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात फारशी कामगिरी करता आली नाही. तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही तो फ्लॉप ठरला. त्याचबरोबर पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या कसोटीतही आर अश्विनची आगपाखड पाहायला मिळत आहे. अश्विनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
GONEEEEE!#TeamIndia bowlers have the ball talking and Aussie batters dancing to their tunes!
Ashwin gets two huge wickets of Labuschagne and Smith! 🔥Tune-in to the action in the Mastercard #INDvAUS Test on Star Sports & Disney+Hotstar! #BelieveInBlue #TestByFire pic.twitter.com/xxgiqyrRau
— Star Sports (@StarSportsIndia) February 17, 2023
भारत (प्लेइंग इलेव्हन):
रोहित शर्मा (क), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (w), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन):
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (डब्ल्यू), पॅट कमिन्स (सी), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनमन
हे ही वाचा..
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण