Viral Video: रविचंद्रन अश्विनने बेन स्टोक्सला टाकला एवढा जबरदस्त चेंडू की, काही कळायच्या आतच स्टोक्स झाला बाद;कर्णधार रोहित शर्माही झाला चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: रविचंद्रन अश्विनने बेन स्टोक्सला टाकला एवढा जबरदस्त चेंडू की, काही कळायच्या आतच स्टोक्स झाला बाद;कर्णधार रोहित शर्माही झाला चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

रविचंद्रन अश्विन:  हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेमधील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय संघाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विनने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला एवढ्या जबरदस्त पद्धतीने बाद केले की, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

 

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 37 वे शतक टाकण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला बोलावले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवीचंद्र अश्विनने बेन स्टोक्सला अश्या पद्धतीने बाद केले की, स्वतः कर्णधार सुद्धा हैराण झाला. त्याला काही कळायच्या आतच चेंडू स्टंपवर जाऊन लागला आणि अंपायरचे बोट वर उचलले गेले. रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा हा चेंडू कसा टाकला होता, हे स्टोक्सला लवकर समजले गेले नाही..

रविचंद्रन अश्विनने बेन स्टोक्सविरुद्ध केला खास विक्रम.

Viral Video: रविचंद्रन अश्विनने बेन स्टोक्सला टाकला एवढा जबरदस्त चेंडू की, काही कळायच्या आतच स्टोक्स झाला बाद;कर्णधार रोहित शर्माही झाला चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सविरुद्ध एक महान विक्रम केला आहे. हैदराबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात अश्विनने स्टोक्सला त्याच्या एका शानदार चेंडूने बाद केले. अश्विनने स्टोक्सला कसोटी क्रिकेटच्या एका डावात 12 व्यांदा बाद केले. यासह स्टोक्स हा अश्विनविरुद्ध सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज बनला.

रविचंद्रन अश्विन  500 विकेट्सच्या जवळ

हैदराबाद कसोटीपूर्वी रविचंद्रन अश्विनने 490 कसोटी बळी घेतले होते. त्यानंतर या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने तीन विकेट घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात स्टोक्सला बाद करून त्याने आपली 495वी कसोटी विकेट घेतली. यासह तो 500 च्या जादुई आकड्याच्या जवळ आला. अश्विनने ही कामगिरी केल्यास अनिल कुंबळेनंतर असे करणारा तो दुसरा भारतीय ठरेल.

 

IND vs ENG कसोटीची स्थिती.. चौथ्या दिवशी दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी.

इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 246 धावा केल्यानंतर सर्व 10 विकेट्स गमावल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 436 धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील धावसंख्येच्या आधारे भारताकडे 190 धावांची आघाडी होती. पहिल्या डावातील धावसंख्येवर आघाडी सोडून इंग्लंडने सध्यातरी डावातील पराभव टाळला आहे.

पण तरीही टीम इंडियाची पकड मजबूत आहे. इथून इंग्लंडने कितीही धावा केल्या तरी टीम इंडियाला चौथ्या डावात पाठलाग करावा लागेल. वृत्त लिहिपर्यंत ओली पोप 150  च्या वर धावा केल्तया  आहे. तो किती काळ टिकतो आणि टीम इंडिया किती टार्गेट पूर्ण करते हे पाहने रंजक ठरेल. सध्या इंग्लंडचा संघ 162 धावांनी आघाडीवर आहे त्यांनी 7 विकेट्स गमावले आहेत. टीम इंडिया इंग्लंडला किती धावापर्यंत थांबवू शकेलआणि नंतर ते टार्गेट शेवटचा दिवस संपण्याच्या आधी पूर्ण करू शकेल का? याचे उत्तर येणारा दिवसच सांगेल.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *