IND vs ENG: आर अश्विन म्हणजे शंभर नंबरी सोनं; क्रिकेटच्या 147 वर्षात अशी कामगिरी करणारा बनला पहिला गोलंदाज!

0

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यांमध्ये अश्विनच्या जादुई फिरकीचा करिष्मा पाहायला मिळाला. अश्विनी आपल्या शंभराव्या कसोटी मधील पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 5 गडी बाद करत सामन्यात 9 बळी मिळवत इंग्लंडचा डाव उध्वस्त करून टाकला आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने हा सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने निर्विवाद वर्चस्व मिळवले.

IND vs ENG: कारकीर्दीच्या 100 व्या कसोटीमध्ये 5 विकेट्स घेणारा अश्विन बनला पहिला खेळाडू..!

IND vs ENG: आर अश्विन म्हणजे शंभर नंबरी सोनं; क्रिकेटच्या 147 वर्षात अशी कामगिरी करणारा बनला पहिला गोलंदाज!

आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात अश्विनला फलंदाजीत भोपळाही फोडता आला नाही, मात्र धारदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना सोळो की पळो करून सोडले. अश्विनने आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात आणि शंभराव्या कसोटी सामन्यात 5 विकेट घेणारा जगातला पहिला गोलंदाज बनला आहे. अश्विन 147 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज आहे. दुसऱ्या डावात अश्विनने जॅक क्राउली, डकेट, ओली पोप, बेन स्टोक्स आणि फोक्स यांना पवेलियनमध्ये परत पाठवले.

आर. अश्विनने इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा केला. त्याने पाच सामन्यात 26 विकेट घेतले. या कसोटी मालिकेत त्याने 500 बळीचा टप्पा देखील पूर्ण केला. यासह तो मायदेशात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील झाला आहे. अश्विनने अनिल कुंबळे याला पाठीमागे टाकत नवा विक्रम केला. मायदेशात सर्वाधिक विकेट घेण्याचा अनिल कुंबळेचा विक्रम त्याने काल मोडीत काढला.

IND vs ENG: आर अश्विन म्हणजे शंभर नंबरी सोनं; क्रिकेटच्या 147 वर्षात अशी कामगिरी करणारा बनला पहिला गोलंदाज!

यासह आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध बळींचे शतक देखील पूर्ण केले. त्याने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध 113 बळी टिपले आहेत. 2011 मध्ये अश्विनने वेस्ट इंडीज विरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा त्याने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 9 गडी बाद केले होते.

कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा हैदराबाद कसोटीत 28 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर भारताने सलग चार कसोटी सामने जिंकत मालिकेवर कब्जा मिळवला. 112 वर्षाच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिला कसोटी सामना हरल्यानंतर मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावे करण्याचा विक्रम भारतीय संघाने केला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत या नवीन खेळाडूचा समावेश, रोहित शर्मा आणि विराट कोहली नंतर येतो त्याचा नंबर.

Leave A Reply

Your email address will not be published.