IND vs AUS LIVE: दिल्ली कसोटीमध्ये पहिल्याच दिवशी भारतीय दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने केला नावावर हा मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू…
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नवा विक्रम रचण्यात यशस्वी ठरला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळी पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करून त्याने ही कामगिरी केली. या सामन्यापूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 249 विकेट घेतल्या होत्या. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो आठव्या क्रमांकावर आहे. जडेजा आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 250 बळी आणि 2500 धावा करणारा भारतीय ठरला आहे.

हा विक्रम करणारा जडेजा (Ravindra Jadeja) ठरला पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू..
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद 250 बळी आणि 2500 धावा करणारा जडेजा हा पहिला क्रिकेटर ठरला आहे. दुसरीकडे, एकूण विक्रमावर नजर टाकली, तर हा विक्रम करणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी इंग्लंडच्या इयान बॉथमने 55 कसोटीत 250 बळी आणि 2500 धावा केल्या होत्या.
भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा जडेजा आताआठवा गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे 619, आर अश्विन 457, कपिल देव 434, हरभजन सिंग 417, इशांत शर्मा 311, झहीर खान 311 आणि बिशन सिंग बेदी यांनी 266 विकेट्स घेतल्या आहेत.
रवींद्र जडेजाची कसोटी कारकीर्द
Milestone 🚨 – @imjadeja becomes the fastest Indian and second fastest in world cricket to 250 Test wickets and 2500 Test runs 🫡🫡#INDvAUS pic.twitter.com/FjpuOuFbOK
— BCCI (@BCCI) February 17, 2023
रवींद्र जडेजाने २०१२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात कसोटी पदार्पण केले होते. गेल्या 10 वर्षांपासून तो टीम इंडियाचा नियमित भाग आहे. जडेजाने आतापर्यंत ६१ कसोटी सामने खेळले आहेत. तो दिल्लीत त्याच्या कारकिर्दीतील 62 वा सामना खेळत आहे. कसोटीत अष्टपैलू कामगिरी करताना त्याने 2593 धावा करण्यासोबतच 250 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत त्याच्या नावावर 3 शतके आणि 18 अर्धशतके आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये नाबाद 175 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार केला तर त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 48 धावांत 7 बळी मिळवणे. दुसरीकडे, दिल्लीत खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने 58 षटकांत 6 बाद 199 धावा केल्या होत्या.
हे ही वाचा..
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण