भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलिया विरुध्द सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जोरदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात केवळ गोलंदाजीने नव्हे तर, फलंदाजीने देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुरुवातीला गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले. तर फलंदाजीला आल्यानंतर त्याने ११४ चेंडूंचा सामना करत अर्धशतक झळकावले. हे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील १८ वे अर्धतक ठरले. यासह त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय खेळाडू..
रवींद्र जडेजा एकाच डावात सर्वाधिक वेळेस पाच गडी बाद करणारा आणि अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्याने ५ वेळेस हा कारनामा केला आहे. या बाबतीत त्याने दिग्गज खेळाडू कपिल देव यांना मागं सोडलं आहे. कपिल देव यांनी ४ वेळेस हा कारनामा केला होता. तर भारतीय संघातील फिरकीपटू आर अश्विन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. अश्विनने ३ वेळेस हा कारनामा केला आहे.
यासह त्याने एकाच कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा आणि ५ गडी बाद करण्याच्या विक्रमात त्याने आर अश्विनची बरोबरी केली आहे. दोघांनी ६-६ वेळेस हा कारनामा केला आहे.

जडेजाने या सामन्यात सर्वप्रथम मार्नस लाबुशेनला माघारी धाडले. त्यानंतर त्याने मॅट रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, पिटर हँड्सकोंब आणि टॉड मर्फीला माघारी धाडले.
हे ही वाचा…
विराटला बाद करताच टॉड मर्फीची पहिली रिॲक्शन आली समोर; वाचा काय म्हणाला…