Ravindra Jadeja obstructing field: रवींद्र जडेजाला बाद देने योग्य निर्णय होता? जडेजा आधी या 2 खेळाडूंनाही दिले होत असेच बाद. पहा नक्की काय आहे प्रकरण..!

0
2
Ravindra Jadeja obstructing field: रवींद्र जडेजाला बाद देने योग्य निर्णय होता? जडेजा आधी या 2 खेळाडूंनाही दिले होत असेच बाद. पहा नक्की काय आहे प्रकरण..!

Ravindra Jadeja obstructing field: आयपीएल 2024 मध्ये, रविवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये चेन्नईने पाच विकेट्सने सामना जिंकला. या सामन्यादरम्यान असे काही पाहायला मिळाले जे क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल रवींद्र जडेजा दोषी आढळला आणि चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ नियमानुसार आऊट करण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर जडेजा चांगलाच संतापलेला दिसत होता.

Ravindra Jadeja

Ravindra Jadeja obstructing field: नक्की कसा झाला जडेजा बाद?

आवेश खान 16व्या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या अगदी जवळ होता, रवींद्र जडेजाने तो थर्ड मॅनवर खेळला आणि त्याला दोन धावा काढायच्या होत्या, पण सहकारी रुतुराज गायकवाडने नकार दिला, दरम्यान चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. संजूने नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला, पण हा चेंडू जडेजाला लागला. संजू सॅमसनने ऑब्स्ट्रक्ट द फील्डिंग नियमानुसार बाद देण्याची मागणी केली. तिसऱ्या पंचाचा असा विश्वास होता की जडेजा थ्रो पाहत आहे आणि मुद्दाम थ्रोच्या मार्गात आला, म्हणून त्याला आऊट देण्यात आला.

रवींद्र जडेजा ‘क्षेत्रात अडथळा आणून’ बाद होणारा ठरला तिसरा फलंदाज.

Ravindra Jadeja obstructing field: रवींद्र जडेजाला बाद देने योग्य निर्णय होता? जडेजा आधी या 2 खेळाडूंनाही दिले होत असेच बाद. पहा नक्की काय आहे प्रकरण..!

आयपीएलमध्ये मैदानात अडथळा आणून बाद होणारा रवींद्र जडेजा हा तिसरा फलंदाज आहे. रवींद्र जडेजाआधी आयपीएलमध्ये युसूफ पठाण आणि अमित मिश्रा अशाप्रकारे बाद झाले होते.

आयपीएल इतिहासात ओबीएस (ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड) नियमाने बाद असलेले फलंदाज

  1. रवींद्र जडेजा (CSK)- vs राजस्थान रॉयल्स 2024*

  2. युसूफ पठाण (KKR) – विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया – रांची, २०१३

अमित मिश्रा (DC) – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – विशाखापट्टणम, 2019


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IPL 2024 :चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची निराशाजनक कामगिरी सुरुच, आतापर्यंत केल्यात फक्त एवढ्या धावा तर नकोसा विक्रमही नावावर..

!RCB Qualification Scenario IPL 2024: आरसीबी आजून देखील प्ले ऑफ मध्ये प्रवेश करू शकते ? फक्त पुढील सामन्यात करावेलागेल हे मोठे धाडसी काम..!

RCB vs DC: दिनेश कार्तिकच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम, कोणत्याही खेळाडूला आवडणार नाही अशी कामगिरी कार्तिकने केलीय..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here