मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर रवींद्र जडेजा आणि रवीचंद्र अश्विनने ‘Natu-Natu’ गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..
आर अश्विन (Ravichandra Ashwin ) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची संयुक्तपणे भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी मालिका सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. बिसीसिआयने स्वतः हा व्हीडिओ लाईक केला आहे.

अश्विन जडेजाचा मजेदार व्हिडिओ
अश्विन आणि जडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते अभिनेता अक्षय कुमारच्या आवाजात ‘एक तेरा एक मेरा’ डायलॉग ऐकताना दिसत आहेत. त्याच वेळी, दोघांच्या व्हिडिओमध्ये आरआरआरचे नातू-नातू हे गाणेही वाजताना दिसत आहे. ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेच दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अश्विन-जडेजा यांनी मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे.
गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये शानदार कामगिरी.
चार सामन्यांच्या मालिकेत आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यामुळेच अश्विन आणि जडेजा यांची संयुक्तपणे प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून निवड करण्यात आली. यानंतर दोन्ही खेळाडू खूप आनंदी दिसत होते. याशिवाय दोघांचे मजेदार व्हिडिओही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि रामचंद्रनचे चेहरे अश्विन आणि जडेजाचे चेहरे सेट करून व्हायरल केले जात आहेत.
Ashwin – Jadeja spin duo on fire. (📷 : Ashwin Instagram) pic.twitter.com/tEeoSvSWiG
— Johns. (@CricCrazyJohns) March 13, 2023
अश्विनची कामगिरी
अश्विनने चार सामन्यांच्या मालिकेत चमकदार गोलंदाजी करत चारही सामन्यात 25 विकेट घेतल्या, शिवाय 86 धावा केल्या. अश्विनने वेळेवर विकेट घेतल्या, त्यामुळे टीम इंडिया पहिल्या दोन कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरली. अश्विनने या मालिकेत तीन वेळा पाचहून अधिक विकेट घेतल्या.
Congratulations India for WCT Final and winning BGT 2023.
Ravi Ashwin & Ravindra Jadeja both Player of the series in BGT 2023.
Ash Anna 🤝 Jaddu be like. pic.twitter.com/BgycZVYgWt
— Ashutosh Srivastava 🇮🇳 (@sri_ashutosh08) March 13, 2023
जडेजाची कामगिरी
त्याचवेळी ६ महिन्यांनी मैदानात परतलेला रवींद्र जडेजाही या मालिकेत चांगलाच चमकला आहे. जडेजाने या मालिकेत 135 धावा करत 22 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने अर्धशतकही झळकावले. या मालिकेत रवींद्र जडेजाने कसोटी क्रमांक एकचा फलंदाज मार्नस लॅबुशेनला चार वेळा बाद केले. तर स्टीव्ह स्मिथ तीन वेळा बाद झाला. दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी केली.
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…