वनडे क्रिकेटमध्ये जडेजाने ठोकले स्पेशल शतक: झहीरला पाठीमागे टाकत केली अनोख्या विक्रमाची नोंद

जडेजा

वनडे क्रिकेटमध्ये जडेजाने ठोकले स्पेशल शतक: झहीरला पाठीमागे टाकत केली अनोख्या विक्रमाची नोंद


भारताचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या बाराव्या सामन्यात त्याने दोन गडी बाद करून कारनामा केला आहे. जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर एक लाखहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत जडेजाने एक स्पेशल सेंचुरी ठोकत नवा विक्रम रचला आहे.

रवींद्र जडेजा ठरला अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 गडी बाद करणारा गोलंदाज.

गुजरात मध्ये जन्मलेला व डाव्या हाताने गोलंदाजी करणारा फिरकीपटू रवींद्र जडेजा हा भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 हून अधिक गडी बाद करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. या आधी हा विक्रम जाहीर खानच्या नावावर होता. त्याने भारतात खेळताना 65 एकदिवसीय सामन्यात 94 गडी बाद केले आहेत. झहीर खानचा हा विक्रम मोडीत काढत जडेजा ने आपल्या नावावर केला.

विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आठव्यांदा केले चित; पाकिस्तानची पराभवाची मालिका कायम

भारतात 100 किंवा त्याहून अधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये अनिल कुंबळे, हरभजनसिंग, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ, कपिल देव यांचा समावेश आहे. अनिल कुंबळे (126), हरभजनसिंग (110), अजित आगरकर(109), जवागल श्रीनाथ(103), कपिल देव(100) बळी टिपले आहेत.

रवींद्र जडेजा हा त्याच्या कारकिर्दीत सर्वोत्तम कामगिरी करत आहे. आणखीन तीन-चार वर्ष तो सहज क्रिकेट खेळू शकतो. त्याचा हाच परफॉर्मन्स कायम राहिला तर वरील सर्व गोलंदाजांना पाठीमागे टाकत तो नव्या विक्रमाला गवसणी घालू शकतो.

जडेजा

34 वर्षे रवींद्र जडेजाने त्याच्या कारकीर्दीत 189 आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने खेळला असून त्यात त्याने 36.56 च्या सरासरीने 209 बळी टिपले आहेत. त्याच्या कारकिर्दीत त्याने एकदाच पाच बळी घेतले आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी मध्ये त्याने एकूण 67 सामने खेळला असून त्यात त्याने 275 बळी बाद केले आहेत. तर दोन वेळा 10 गडी बाद करण्याचा तर बारा वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम हे त्याच्या नावावर आहे.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..