‘प्लेअर ऑफ द मॅच’ बनल्यानंतर रवींद्र जडेजाने केले मोठे वक्तव्य…! कर्णधार किंवा कोचला नाही तर या व्यक्तीला दिले सर्व श्रेय..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs AUS) रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरी करताना पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावात मिळून एकूण 7 बळी घेतले.
यासोबतच त्याने पहिल्या डावात टीम इंडियासाठी 185 चेंडूत 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि फलंदाजीतही मोठे योगदान दिले. भारताने सामना जिंकल्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड झालेल्या रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सामन्याबाबत बोलताना मोठे वक्तव्य केले आहे.
पहिल्या कसोटीतील चमकदार कामगिरीचे श्रेय जडेजाने दिले या व्यक्तीला..
View this post on Instagram
पहिल्या कसोटीत भारताच्या शानदार खेळी आणि १३२ धावांनी विजय मिळविल्यानंतर वरिष्ठ अष्टपैलू रवींद्र जडेजा(Ravindra Jadeja) म्हणाला, “खूप छान वाटत आहे. जेव्हा तुम्ही पाच महिन्यांनंतर परत येता आणि तुमचे 100 टक्के देता, धावा काढता आणि विकेट्स घेता…ते आश्चर्यकारक वाटते. मी यादरम्यान NCA मध्ये खूप मेहनत करत होता. NCA कर्मचारी, फिजिओ यांचे आभार मानू इच्छितो. रविवारीही ते माझ्यासोबत खूप मेहनत घेत आहेत.
या ठिकाणी जडेजा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता.
तो पुढे म्हणाला, “आम्हाला चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी करायची होती. चेंडू फिरत होता, सरळ जात होता, खाली ठेवत होता. स्वत:ला स्टंपवर गोलंदाजी करण्यास सांगत राहिलो – जर त्यांनी चूक केली तर मला संधी आहे. मला माहित आहे की ऑस्ट्रेलियन फलंदाजांना स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळायला आवडते, ज्याचा मी फायदा घेतला.

मला गोष्टी साध्या ठेवायच्या आहेत. मी फलंदाजीत फारसा बदल करत नाही. मी आता माझ्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करतो कारण ते महत्त्वाचे आहे.”
पहिल्या कसोटी सामन्यातील जडेजाच्या कामगिरीवर एक नजर!
रवींद्र जडेजाने भारतासाठी पहिल्या डावात 22 षटके टाकली, 45 धावांत 5 बळी घेतले. यानंतर त्याने शानदार फलंदाजी करत टीम इंडियासाठी पहिल्या डावात 185 चेंडूत नऊ चौकारांसह 70 धावा केल्या. यानंतर, त्याने दुसऱ्या डावात अप्रतिम गोलंदाजी केली आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, ज्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या दिवशीच सामना जिंकण्यात यशस्वी झाला.
हेही वाचा:
या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत..
.न्यूझीलंड पोहोचताच रस्त्यावर फिरायला लागले भारतीय खेळाडू, यजुवेन्द्र चहलने शेअर केलेले फोटो होताहेत व्हायरल..
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..