‘माहोल है भाई..” आरसीबीच्या विजयानंतर बेंगळुरूच्या रस्त्यावर तुफान गर्दी, रात्री ३ वाजेपर्यंत रोडवर चाहत्यांचा जल्लोष; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

'माहोल है भाई.." आरसीबीच्या विजयानंतर बेंगळुरूच्या रस्त्यावर तुफान गर्दी, रात्री ३ वाजेपर्यंत रोडवर चाहत्यांचा जल्लोष; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

WPL 2024 RCB  Champion  : महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये, स्मृती मंधानाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मेग लॅनिंगच्या दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने एकदाही विजेतेपद पटकावले नाही, परंतु डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात आरसीबीने विजेतेपद पटकावले. आरसीबीच्या विजयानंतर चाहत्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही. आरसीबीच्या चाहत्यांनी बेंगळुरूच्या रस्त्यावर जल्लोष साजरा केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आरसीबीने विजेतेपद मिळवताच बंगळुरूचे रस्ते जाम, व्हिडीओ तुफान व्हायरल..

'माहोल है भाई.." आरसीबीच्या विजयानंतर बेंगळुरूच्या रस्त्यावर तुफान गर्दी, रात्री ३ वाजेपर्यंत रोडवर चाहत्यांचा जल्लोष; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलसह 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, आरसीबीच्या चाहत्यांना ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद साजरा करायला मिळाला. अशा चाहत्यांनी हा विजय मोठ्या थाटात साजरा केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बेंगळुरूचा असल्याचं म्हटलं जात आहे ज्यात हजारो आरसीबी चाहते त्यांचा संघ चॅम्पियन झाल्याचा आनंद साजरा करत आहेत.

WPL 2024: दिल्ली चे स्वप्न भंग करून आरसीबीने आपले स्वप्न पूर्ण केले!

महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात प्रथमच, RCB ने दिल्ली कॅपिटल्सचा आणि तोही मोठ्या सामन्यात पराभव केला आहे. याआधी हे दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले होते आणि दिल्ली कॅपिटल्सने चारही वेळा आरसीबीचा पराभव केला होता. मागील हंगाम आरसीबीसाठी खूपच खराब होता आणि संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गेल्या मोसमातही फायनलमध्ये पोहोचला होता पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर यावेळी आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी खूपच खराब झाली आणि संपूर्ण संघ केवळ 113 धावाच करू शकला. सामन्यात एके काळी दिल्लीची फलंदाजी चांगलीच सुरू होती आणि 64 धावांपर्यंत संघाने एकही विकेट गमावली नव्हती. यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले आणि दिल्लीचा संपूर्ण संघ 18.3 षटकांतच गडगडला.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *