RCB Squad After WPL Auction: लिलावानंतरही आरसीबीकडे तब्बल एवढे कोटी शिल्लक, असा आहे आरसीबी महिलांचा संपूर्ण संघ..

RCB Squad After WPL Auction: लिलावानंतरही आरसीबीकडे तब्बल एवढे कोटी शिल्लक, असा आहे आरसीबी महिलांचा संपूर्ण संघ..

 

RCB Squad After WPL Auction: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईत झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या मिनी लिलावात त्यांच्या पर्समधील चांगली रक्कम वाचवली. या फ्रँचायझीने या लिलावात ३.३५ कोटी रुपयांची रक्कम घेऊन मैदानात उतरले होते. येथे त्याला फक्त 7 रिकाम्या जागा भरायच्या होत्या. अशा परिस्थितीत या फ्रँचायझीने उर्वरित रिक्त जागा अवघ्या २.३ कोटी रुपयांमध्ये भरल्या. आरसीबीची सर्वात महागडी खेळाडू एकता बिश्त होती. आरसीबीने तिला केवळ ६० लाखांना खरेदी केले.

RCB Squad After WPL Auction: मिनी लिलावात आरसीबीने कोणावर लावली सर्वांत  मोठी बोली?

WPL 2024 Auction Live: थोड्याच वेळात लागणार महिला खेळाडूंवर बोली, पहा कोणत्या संघाकडे आहेत सर्वाधिक पैसे, कोणाला किती खेळाडूंची गरज, सर्व माहिती एका क्लिकवर..

आरसीबीने भारतीय गोलंदाज एकता बिष्टला ६० लाखांमध्ये खरेदी केले. फ्रेंचायझीची दुसरी सर्वात महागडी खेळाडू ऑस्ट्रेलियन अष्टपैलू जॉर्जिया वेरहॅम होती. आरसीबीने तिच्यावर  40 लाख रुपये खर्च केले. याशिवाय या फ्रँचायझीने प्रत्येकी 30 लाख रुपयांना चार खेळाडू खरेदी केले.

आरसीबीने इंग्लिश गोलंदाज केट क्रॉस, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू सोफी मोलिनेक्स, भारतीय गोलंदाज सिमरन बहादूर, भारतीय अष्टपैलू सबिनानी मेघना यांच्यावर प्रत्येकी ३० लाख रुपये खर्च केले. याशिवाय भारताची अष्टपैलू खेळाडू शुभा सतीशला अवघ्या 10 लाखांमध्ये खरेदी करण्यात आले.

मिनी लिलावानंतर आरसीबीचा संघ (Rcb Squad For WPL 2024)

स्मृती मानधना, सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, आशा शोभना, दिशा कसाट, एकता बिष्ट, जॉर्जिया वेरेहम, केट क्रॉस, सोफी मॉलिन्युक्‍स, सिमरन बाहुजा, सिमरन बाहुली , शुभा सतीश.

RCB Squad After WPL Auction: लिलावानंतरही आरसीबीकडे तब्बल एवढे कोटी शिल्लक, असा आहे आरसीबी महिलांचा संपूर्ण संघ..

RCB Squad After WPL Auction: मिनी लीलावाआधी आरसीबीने 11 खेळाडूंना कायम ठेवले होते.

 

या लिलावापूर्वी, आरसीबीने 11 खेळाडूंना कायम ठेवले होते आणि आपल्या मागील संघातील 7 खेळाडूंना सोडले होते. या 11 खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी आरसीबीने एकूण 10.15 कोटी रुपये खर्च केले. या संघात स्मृती मानधना आणि एलिस पेरी सारख्या खेळाडू खूप महाग आहेत. या सीझनसाठी प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्समध्ये 13.5 कोटी रुपये होते. अशा स्थितीत आरसीबीकडे लिलावासाठी ३.३५ कोटी रुपये शिल्लक होते.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *