IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघाचे नाव बदलणार, आता या नवीन अवतारात दिसेल RCB टीम.

Cricket 14

 

गेल्या 14 वर्षापासून देशात आयपीएल T20 क्रिकेट चे सामने खेळले जात आहेत. या T20 क्रिकेट चा सर्वात जास्त फायदा हा युवा खेळाडूंना तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आहे. आपल्या देशातील बहुतांशी लोकांचा सर्वाधिक आवडता खेळ हा क्रिकेट आहे. दरवर्षी आयपीएल चे सामने होतात प्रत्येक वर्षी आपल्याला सर्व संघात विभिन्नता आढळून येते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघाचा नवीन अवतार कसा असेल याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

 

Cricket 14

यंदा च्या आयपीएल सीजन मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघात मोठे बदल झालेले आपल्याला दिसून देत आहेत. येत्या काही दिवसात आयपीएल सुरू होणार असल्यामुळे सर्व संघांनी तशी तयारी सुरू केलेली आहे. तसेच सर्वाचे ट्रेनिंग कॅम्प सुद्धा सुरू झालेले आहेत. परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. वास्तविक RCB अनबॉक्स इव्हेंट दरम्यान एक घोषणा करण्याच्या तयारीत आहे. या इव्हेंट मध्ये संघाचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे.

 

IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या नावात बदल:-

येत्या 19 मार्च ला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आरसीबी अनबॉक्स इव्हेंटचे आयोजन केले आहे. या इव्हेंट मध्ये संघाच्या नावात बदल करण्याची दाट शक्यता आहे. 2014 मध्ये बेंगलूरूचे नाव बदलून बेंगळुरू करण्यात आले, परंतु RCB या संघाने नावात कोणताही बदल न करता जुन्या नावाने खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु या सीजन मध्ये संघ संघाचे नाव बदलण्याच्या तयारीत आहेत.

 

 

RCB जोरदार तयारीत:-

येत्या थोड्याच दिवसात आयपीएल चे सामने सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक संघांनी प्रॅक्टिस कॅम्प सुरू केले आहेत. परंतु दिग्गज खेळाडू अजून प्रॅक्टिस कॅम्प मध्ये सामील झाले नाहीत.

 

 

IPL 2024 RCB संघ:-

फाफ डू प्लेसिस , ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाख, आकाश दीप,मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान या खेळाडूंचा संघात समावेश असेल.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- जगातील 10 क्रिकेटर जे लेट कट खेळण्यात आहेत तरबेज, भारतातील या खेळाडूंचा समावेश.

 

 

हे ही वाचा:- IPL 2024 RCB:- यंदा आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी RCB कडे, हे 5 दिग्गज खेळाडू मिळवून देऊ शकतात RCB ला चॅम्पियन ट्रॉफी.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *