RCB vs CSK : आयपीएलमध्ये आज धोनी आणि कोहली एकमेकानाविरोधात शेवटचा सामना खेळणार? असे असतील दोन्ही संघ, पहा कोणत्या संघाचे पारडे आहे जड..!
RCB vs CSK : आयपीएलमध्ये आज धोनी आणि कोहली एकमेकानाविरोधात शेवटचा सामना खेळणार? असे असतील दोन्ही संघ, पहा कोणत्या संघाचे पारडे आहे जड..!
IPL 2023, RCB vs CSK: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर(RCB) यांच्यात सोमवारी सामना होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियम 1969 मध्ये पूर्ण झाले आणि सुमारे 40,000 आसनक्षमता आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद महेंद्रसिंग (MS DHONI)धोनीकडे आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान फाफ डू प्लेसिसकडे FAF DU PLESIS) आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर लय कायम ठेवू इच्छितो. दुसरीकडे राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई संघाला पुनरागमन करायचे आहे.
IPL 2023 RCB vs CSK Pitch Report: बंगळुरूची खेळपट्टी कशी असेल?
बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियम लहान आहे. आयपीएलमध्ये हे गोलंदाजांचे कब्रस्तान मानले जाते, येथील खेळपट्टीवर खूप धावा होतात आणि चौकार-षटकारांचा पाऊस पडतो. यावेळीही येथील खेळपट्टीवर फारसा बदल होणार नाही. खेळपट्टी सपाट आहे आणि गोलंदाजांना विकेट घेणे कठीण जाईल. या मैदानाच्या पहिल्या डावाची सरासरी 170 धावा आहे. येथे नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार सहसा पाठलाग करणे पसंत करतात.
चिन्नास्वामी स्टेडियम रेकॉर्ड – chinnaswami stadium records
या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये केवळ ३३ सामने (३९.७६ टक्के) जिंकले आहेत. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे ४६ सामने (५५.४२ टक्के) जिंकले आहेत. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या RCB (263/5 vs पुणे वॉरियर्स, 2017) च्या नावावर आहे. RCB (82 vs कोलकाता नाइट रायडर्स (KKR), 2008) च्या नावावर किमान स्कोअर देखील नोंदवला गेला आहे.
असे असतील दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू (Plying 11 of RCB vs CSK both teams)
चेन्नई सुपर किंग्ज संघ (Csk) : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांडा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अहय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हेलगेकर. , मिचेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंग, मथिसा पाथीराना, महेश टीक्षाना, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद आणि तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (Rcb) : फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, वेन पारनेल, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव आणि मायकेल ब्रेसवेल.
हेही वाचा: