RCB vs CSK live: टी-२० क्रिकेटचा सर्वांत मोठा महाकुंभ आजपासून सुरु झाला आहे. आयपीएल 2024 ला आजपासून सुरुवाट झाली आहे. पुढील काही महिने आता हा महासंग्राम चालणार आहे. या हंगामाचा पहिला सामना आज आरसीबी आणि सीएसके यांच्यामध्ये खेळवला जात आहे.
RCB vs CSK live: फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय.
नाणेफेक झाले तेव्हा कौल आरसीबी कर्णधार फाफ डूप्लेसीच्या बाजूने पडला. आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईकडून युवा कर्णधार ऋतूराज गायकवाड पहिल्यांदा आयपीएलमध्ये नाणेफेक करण्यासाठी उतरला होता मात्र त्याने हे नाणेफेक गमावले. आता युवा कर्णधार ऋतूराज कसा आपल्या गोलंदाजाना सांभाळतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
RCB vs CSK live: असे आहेत दोन्ही संघ.
RCB चा प्लेइंग इलेव्हन:- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.
सीएसकेचा प्लेइंग इलेव्हन:- रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.