RCB vs RR: आयपीएल 2024 च्या 68व्या लीग सामन्यात सीएसके विरुद्ध विजय मिळवणारा संघ आरसीबी, बुधवारी, 22 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करेल. दोन्ही संघांना आयपीएल 2024 मध्ये पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही किंमतीत हा सामना जिंकावा लागेल.
RCB vs RR: पराभव झालेला संघ होणार बाहेर.
या सामन्यातील पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल, तर विजयी संघ क्वालिफायर 2 मध्ये क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. यानंतर, क्वालिफायर 2 चा विजेता संघ रविवार 26 मे रोजी आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात क्वालिफायर 1 च्या विजेत्या संघाशी म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे.
आरसीबी चौथ्यांदा एलिमिनेटरसाठी पात्र ठरला.
आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आरसीबीने पात्र ठरण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी, RCB 2020, 2021 आणि 2022 मध्ये पात्र ठरले होते. 2020 आणि 2021 मध्ये दोनदा, संघाचा प्रवास एलिमिनेटरमध्ये संपला, तर एकदा 2022 मध्ये, RCBने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध एलिमिनेटर सामना जिंकला. मात्र, याच काळात आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
RCB vs RR Head to Head:दोन्ही संघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत.
आयपीएलमधील आरसीबी आणि आरआर यांच्यातील सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ एकूण ३१ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी आरसीबीने १५ वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी, राजस्थान रॉयल्सने 13 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. याशिवाय, RCB ने IPL 2024 चे शेवटचे सलग 6 सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. त्याचवेळी राजस्थानला गेल्या ५ सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.