RCB vs GG LIVE: स्मृती मानधनाच्या आरसीबीला आजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा, आज तगड्या गुजरात सोबत करणारा दोन हात, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू.
RCB vs GG LIVE: स्मृती मानधनाच्या आरसीबीला आजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा, आज तगड्या गुजरात सोबत करणारा दोन हात, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू.
सध्या मुंबईमध्ये पहिले वहिले WPL अर्थात महिला प्रीमियर लीग सुरु आहे. गेल्या 3/4 दिवसापूर्वी सुरु झालेल्या या लीगमध्ये जवळपास सर्वच 5 संघाने एक किंवा दोन सामने खेळले आहेत. आयपीएलमधील प्रसिद्ध संघ आरसिबीची फ्रेन्चायझी असलेली महिला संघ आरसीबी या सीजनमध्ये पहिले दोन सामने गमावून आज गुजरातसोबततिसरा सामना खेळणार आहे.
याआधी मुंबई आणि दिल्लीने आरसीबीला मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. गुनतालिकेत सध्या गुजरात सर्वांत खाली असून त्यावर आरसीबीचा संघ आहे.
View this post on Instagram
हे दोन्ही संघ आपले सुरवातीचे दोन्ही सामने गमावून इथपर्यंत पोहचले आहेत. आजच्या दिवशी होणार्या या सामन्यात दोघांपैकी एका संघाचे विजयाचे खाते उघडणार हे मात्र नक्की. आता गुजरातचा संघ आरसीबीवर भारी पडतो का ? आरसीबी या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
आरसीबीच्या या स्टार खेळाडूकडे असेल सर्वांचे लक्ष..
महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वांत महाग खेळाडू ठरलेली स्मृती मानधना ही आरसीबी संघाची कर्णधार आहे. तिला लिलावात विकत घेताच आरसीबीने संघाची कमान तिच्या हातात देणार असल्याची घोषणा केली होती. निच्छितच एवढ्या मोठ्या खेळामध्ये सर्वांत जास्त ररक्कम मोजून संघात सहभागी करून घेतलेल्या या खेळाडू कडून आरसीबीला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.

स्मृती पहिल्या दोन सामन्यात मुंबईविरुद्ध 23 तर दिल्लीविरुद्ध 35 धावा काढू शकली. शिवाय कर्णधारपणामध्ये सुद्धा स्मृतीकडून अनेक चुका झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे संघाला दोन्ही सामने गमवावे लागले. आजपर्यंतचा स्मृतीचा खेळ पाहता ती संघाच्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकली नाहीये.
मात्र इथून पुढे तरी चांगली कामगिरीकरून संघाला पहिला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने आज स्मृती मैदानात पाय टाकणार आहे. त्यामुळे आजच्या या सामन्यात सर्वांचे लक्ष हे स्मृतीच्या कामगिरीकडे असेल.
दुसरीकडे मात्र गुजरातची कर्णधार गार्डनर आणि अष्टपैलू खेळाडू हरनील देओल जबरदस्त फोर्ममध्ये दिसून येत आहेत. मागच्या सामन्यात अगदीच थोडक्यात विजयाने त्यांना हुलकावणी दिली मात्र त्याची कमी भरून काढण्याची सर्व तयारी गुजरातच्या संघाचे आज केलेली असेल. एकंदरीत काय तर आजचा हा गुजरात VS आरसीबी सामना चांगलाच रंगतदार होणार यामध्ये मात्र वाद नाही.
Come on RCB !!!! You can do it today😂. pic.twitter.com/l3b2z9w5Nb
— Jaya M (@itzmejayam) March 8, 2023
असे असू शकतात दोन्ही संघ:
गुजरात जायंट्स – एस मेघना, सर डंकले, एच देओल, टीपी कंवर, डी हेमलता, ए गार्डनर, स्नेह राणा (कर्णधार), केजे गर्थ, एस वर्मा, ए सदरलँड, एम जोशी.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – एस मंधाना (कर्णधार), डीडी कसाट, एचसी नाइट, एसएफएम डिव्हाईन, ईए पेरी, कनिका आहुजा, प्रीती बोस, रिचा घोष, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग, एमएल शट.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.