RCB vs PBKS live: आयपीएल 2024 च्या 58 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB vs PBKS )होत आहे. PBKS ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आल्यानंतर विराट कोहलीने आरसीबीसाठी तुफानी खेळी केली. धरमशालामध्ये पाऊस आणि गारपिटीनंतर विराट कोहलीने गोलंदाजांवर ताशेरे ओढले.मात्र त्याचे शतक 8 धावांनी हुकले. त्याने 47 चेंडूत 195.74 च्या स्ट्राईक रेटने 92 धावा केल्या. या खेळीत किंग कोहलीने 7 चौकार आणि 6 षटकार मारले. या खेळीदरम्यान विराटने इतिहास रचत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
92 runs
195 strike rate
Overall innings, priceless 🙇♂️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #PBKSvRCB @imVkohli pic.twitter.com/IC5cLlm6rZ— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 9, 2024
RCB vs PBKS live: शतक हुकले मात्र विराट कोहलीच्या नावावर झाला हा मोठा विक्रम.
विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो सर्वाधिक विरोधी संघांविरुद्ध 1000 हून अधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. पंजाब किंग्ज व्यतिरिक्त, विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1000+ धावा केल्या आहेत. त्यांच्याशिवाय, रोहित शर्मा (दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स) आणि डेव्हिड वॉर्नर (कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्स) यांनी प्रत्येकी 2 विरोधी संघांविरुद्ध 1000 हून अधिक धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने ठोकल्या 3 हंगामात 600 हून अधिक धावा..!
IPL 2024 मध्ये विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 634 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या बऱ्याच मोसमात संयुक्तपणे ६०० हून अधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने आयपीएल 2013, 2016, 2023 मध्ये 600 हून अधिक धावा केल्या होत्या. त्यांच्याशिवाय ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी 3 हंगामात 600+ धावा केल्या आहेत, तर फाफ डुप्लेसिसने 2 हंगामात 600+ धावा केल्या आहेत.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.