RCB vs RR live: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विराट कोहलीला बाद करताच अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू..

0
17
RCB vs RR live: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विराट कोहलीला बाद करताच अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू..
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RCB vs RR live: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या एलिमिनेटर सामन्यात आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. या सामन्यात 29 धावा करत विराट कोहलीने आयपीएलमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या. त्याने 24 चेंडूत 33 धावांची खेळी केली. युझवेंद्र चहलने विराट कोहलीला डोनोवन फरेराकरवी झेलबाद केले.युझवेंद्र चहल

 

RCB vs RR live: आरआरकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला युझवेंद्र चहल!

युझवेंद्र चहलने विराट कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तो राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

आतापर्यंत त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 15.6 च्या स्ट्राईक रेटने 66 बळी घेतले आहेत. या यादीत सिद्धार्थ त्रिवेदी (65) दुसऱ्या स्थानावर, शेन वॉटसन (61) तिसऱ्या स्थानावर, शेन वॉर्न (57) चौथ्या स्थानावर आणि जेम्स फॉकनर (47) पाचव्या स्थानावर आहे.

RCB vs RR live: चहलची या सामन्यातील कामगिरी.

या सामन्यातील युझवेंद्र चहलच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, त्याने 4 षटकांच्या कोट्यात 10.8 च्या इकॉनॉमीमध्ये 43 धावा देऊन 1 यश मिळविले. चहलने लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

RCB vs RR live: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विराट कोहलीला बाद करताच अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू..

17 व्या मोसमात त्याने आतापर्यंत 14 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 14 डावात 28.44 च्या सरासरीने आणि 9.48 च्या इकॉनॉमीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. सध्याच्या मोसमातील 3/11 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

“भाई इस बार तो उठाले..” RR vs RCB सामना सुरु होण्याआधी कर्णधार फाफ डूप्लेसी ट्रॉफीकडे पाहतच राहिला व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…