कसोटीत रविचंद्रन अश्विनच्या फिरकी पुढे या फलंदाजांनी घातले लोटांगण; वाचा कोणत्या खेळाडूला किती वेळा केलय बाद!

कसोटीत रविचंद्रन अश्विनच्या फिरकी पुढे या फलंदाजांनी घातले लोटांगण; वाचा कोणत्या खेळाडूला किती वेळा केलय बाद!

 रविचंद्रन अश्विन: धर्मशाळा येथे भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात पाचवा आणि अंतिम कसोटी सामना सुरू आहे. हा सामना भारताचा दिग्गज फिरकीपटू आर. आश्विन याच्यासाठी स्पेशल आहे. तो त्याच्या क्रिकेट कारकीर्दी मधील शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. या शंभराव्या कसोटीमध्ये देखील त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली आहे. चार गडी बाद करत त्याने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले आहे. या सामन्यात देखील त्याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

रविचंद्रन अश्विनने कसोटीमध्ये या खेळाडूंना केलंय सर्वाधिक वेळा बाद..!

आर अश्विनची क्रिकेट कारकीर्द अफलातून आहे. तो सध्या केवळ कसोटी क्रिकेट खेळत आहे. प्रत्येक कसोटीत नवनवीन इतिहास घडवला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या शंभर कसोटी सामन्यात 23.9 च्या सरासरीने 511 गडी बाद केले आहेत. चला तर जाणून घेऊया अश्विनने कोणत्या खेळाडूंना सर्वाधिक वेळा बाद केले आहे.

१.बेन स्टोक्स

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा अश्विन द्वारे कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणारा खेळाडू आहे. अश्विनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये बेन स्टोक्स याला सर्वाधिक 12 वेळा बाद केले आहे. कसोटीमध्ये कोणत्याही सामन्यात अश्विन स्टोक्सवर भारी पडलेला पाहायला मिळत.

T-20 World Cup 2024 'या' 4 खेळाडूंचा असणार शेवटचा विश्वचषक, यानंतर पुन्हा कधीही खेळू शकणार नाहीत आयसीसी स्पर्धा...!

२.डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. भल्या भल्या गोलंदाजाच्या पोटात गोळा आणणाऱ्या या खेळाडू मात्र आर अश्विन पुढे लोटांगण घालताना दिसून येतो. आर अश्विन च्या गोलंदाजीवर तो अकरा वेळा बाद झाला आहे.

३.ऍरिस्टर कुक

कसोटी क्रिकेटमध्ये विक्रमांचे मनोरे रचणारा इंग्लंडचा माजी कर्णधार ऍरिस्टर कुक याला 9 वेळा माघारी धाडण्यात आर अश्विनला यश आले आहे. कसोटीमध्ये अश्विनने त्याला अनेक वेळा बाद करून भारतीय संघाला पुनरागमन करून दिले आहे.

४.स्टीव्ह स्मिथ

भल्या-भल्या गोलंदाजांची बोलती बंद करणारा आक्रमक स्टायलिश फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा देखील अनेकदा अश्विनच्या फिरकी जाळ्यात अडकलेला आहे. अश्विनने स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये आठ वेळा बाद केले आहे.

५.क्रेक ब्रेथवेट,जेम्स अँडरसन,टॉम लॅथम,मिचेल स्टार्क

तसेच वेस्टइंडीज चा सलामीचा फलंदाज क्रेक ब्रेथवेट, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज टॉम लॅथम, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी आठ वेळा बाद केले आहे.

आर. अश्विन सध्या केवळ कसोटी क्रिकेट खेळतोय. वनडे आणि टी 20 क्रिकेट मध्ये त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. तो आणखीन दोन-तीन वर्ष क्रिकेट सहज खेळू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळे पहिला स्थानावर आहेत. अश्विनचा हा परफॉर्मन्स कायम राहिला तर तो अनिल कुंबळेचा विक्रम सहज मोडू शकतो.

कसोटीत रविचंद्रन अश्विनच्या फिरकी पुढे या फलंदाजांनी घातले लोटांगण; वाचा कोणत्या खेळाडूला किती वेळा केलय बाद!

मागील दहा वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने जी उंची गाठली आहे त्यामध्ये आर अश्विनचे मोलाचे योगदान आहे. भारताने यापूर्वी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये दोनदा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला त्यात आर अश्विन चे महत्वपूर्ण योगदान आहे. असे असूनही दोन्ही टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आर अश्विन खेळण्याची संधी मिळाली नाही.

भारतीय क्रिकेट संघ यंदाही तुफान फॉर्मात आहे. त्यांचा हा परफॉर्मन्स असाच कायम राहिला तर येणाऱ्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला कोणीच रोखू शकणार नाही.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

– आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा हा आहे पहिला विदेशी खेळाडू!

एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारी हे आहेत खेळाडू! वाचा विराटला कोणते मैदान ठरले लकी