‘रिअ‍ॅलिटी शो’चं मार्केट वाढलंय, त्याचे श्रेय अभिनेत्री मलायका अरोराला जातंय..

‘रिअ‍ॅलिटी शो’चं मार्केट वाढलंय, त्याचे श्रेय अभिनेत्री मलायका अरोराला जातंय..

२०१७ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गावाकडं जिओचं सिम मार्केर्टमध्ये आल्याची खबर पोरांना मिळू लागली होती. त्यासाठी 4G मोबाईलची गरज असल्याचा साक्षात्कार देखील त्याच काळात आम्हा गावाकडंच्या लोकांना झाला होता.

गावातल्या मोजक्या पोरांनी 4G अँड्रॉइड मोबाईल घेतल्यानंतर गावात रेंज येत नाही, म्हणून ते गावाबाहेरच्या शाळेवर येऊन बसायचे. पुढे जसं जसं जिओचं सिम घेणाऱ्यांची संख्या वाढली तशी पारावर न बसता वस्तीजवळल्या टेकडीवर जाऊन बसणाऱ्या पोरांची संख्या वाढत गेली.

त्यावेळी पोरं 2G स्पीडनं 1GB नेट 28 दिवस वापरायचे. पण जिओ आल्यानं पोरांना दिवसाला दीड जीबी नेट मिळायला लागल्यानं ते बघावं तेव्हा मोबाईल मध्ये डोकं घालून बसायचे.

पहिले फेसबुकवर चॅटिंग करण्यात नि व्हाट्सएपवर कॉमेडी व्हिडीओ फॉरवर्ड करण्यातच दीड जीबीचा खात्मा व्हायचा. त्यानंतर आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी चढाओढीवर पोस्टी करायच्या, कमेंटमध्ये भांडत बसायचं हा प्रकार सुरू झाला.

पण आता राजकीय विषयावरून फेसबुक, व्हाट्सएपवर वाद घालणारा बराच क्राउड इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर रील बघण्यात गुंगलाय. टिकटॉक वर बंदी आल्यापासून इन्स्टा आणि फेसबुकवर रील्सचं इतकं प्रमाण वाढलंय की त्याला प्रति टिकटॉकचं रुप आलंय

इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर असलेल्या रिल्स खूप लक्ष वेधून घेतात. त्यामुळे निवडणूक आल्यावर फेसबुकवर गूळ पाडणे, व्हाट्सएप ग्रुपवर भांडण करणे मिम्स, कॉमेडी व्हिडीओ फॉरवर्ड करणे हे सगळं कमी झालंय.

इन्स्टग्रामवर किती रिल्सचा पेव असतो. हे मी सांगायची गरज नाहीये. पण प्रामुख्यानं जिच्या रिल्स बघण्याची बिमारी पोरांना जडली ती म्हणजे, मलायका अरोरा.‘रिअ‍ॅलिटी शो’चं मार्केट वाढलंय, त्याचे श्रेय अभिनेत्री मलायका अरोराला जातंय..

मालायकाच्या रिल्स बघण्यात पोरं दिवस-रात्र घालवतात. ती जिममध्ये व्यायाम करताना. जिम मधून जाता-येताना. तिच्या कुत्र्याला फिरवताना. पार्टीला गेलेली असताना नेहमी तिच्या समोर कॅमेरे असतात. तिची हरेक ऍक्टिव्हिटी तिच्या फॅन्सना कळत असते.

ज्यांना कधीही जिमला जायचं माहिती नसतं. अशी पोरंही मलायकाचे जिम मधले रिल्स बघत असतात. पोरांचा मलायकाच्या रील बघण्यात दोन जीबी डाटा संपतो, यावरून कळेल की, मलायकाच्या रिल्स पोरं किती खुळ्यागत बघतात.

मालायका आज 48 व्या वर्षात पदार्पण करतेय. वयाची 47 वर्षे ओलांडली तरी वयात आलेल्या पोरांपासून ते पन्नाशी ओलांडलेल्या पुरुषांपर्यंत हर तरफ मालायकाचे दिवाने दिसतील.

मालायकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊ, कोण आहे मालाईका आणि अशी काय जादू आहे मलायकामध्ये ज्यामुळे पोरं रियालिटी शो फक्त मलायकासाठी बघतात.

मलायका

मलायकाचा जन्म मुंबईच्या चेंबूरमध्ये झाला. तिचं शालेय शिक्षण चेंबूरच्या स्वामी विवेकानंद शाळेतून झालेलं आहे. तिनं बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अरबाज खानशी लग्न केलं होतं. ते दोघे एका कॉफी जाहिरात शूट दरम्यान भेटले होते. मलायका तेंव्हा मॉडेलिंग करत होती.

मॉडेलिंग मध्ये यशस्वी झाल्यानंतर 1999 मध्ये आलेल्या ‘दिल से’ या चित्रपटात झळकली. मलायका या चित्रपटात पाहिल्यांदाच आयटम साँग करताना दिसली होती. या चित्रपटातील ‘चल छैया छैया’ या गाण्यात मलायका आणि शाहरुखची केमिस्ट्रीनं मलायकला हिट बनवलं.

1999

चल ‘छैय्या छैय्या’च्या प्रचंड यशानंतर 1999 मध्ये मलायकाचे आणखी एक आयटम साँग पडद्यावर आलं. ‘रंगीला मारो ढोलना’ या गाण्यात मलायका आणि अरबाज खान एकत्र होते.

2002

2002 मलायकाचं ‘माही वे’ हे आयटम सॉंग आलं. ते तुफान हिट ठरलं.

2005

2005 मध्ये ‘काल धमाल मे’ या आयटम साँगमध्ये मलायका दिसली. हे गाणं देखील सुपरहिट ठरलं.

2010

2010 मध्ये सलमान खानचा सुपरहिट ठरलेल्या दबंग चित्रपटात ‘मुन्नी बदनाम हुई’ या आयटम सॉंगमध्ये मलायका दिसली. त्यातही मलायकाची अदा कायम असल्याचं दिसून आलं.

2015

2015 मध्ये आलेल्या डॉली की डोली चित्रपटातील ‘फॅशन खतम मुझ पे मै भी या गाण्यात मलायका दिसली. त्यानंतर हाऊसफुल 2 या चित्रपटात मधील ‘अनारकली डिस्को चली’ या गाण्यातून तिनं आपली जादू पुन्हा एकदा दाखवून दिली. आजपर्यंत सगळ्यात सुपर गाण्यांपैकी हे गाण मानलं जातं.

 

याव्यतिरिक्त ये प्यार है नशा जिंदगी का, चोरी चोरी देखे मुझ को, होठ रसीले’ फैशन खत्म मुझ पे, यासारखे हिट आयटम सॉंग मलायकानं दिले आहेत.

‘रिअ‍ॅलिटी शो’चं मार्केट वाढलंय, त्याचे श्रेय अभिनेत्री मलायका अरोराला जातंय..

मलायका टेलिव्हिजन शो ‘नच बलिये’ मध्ये तीन जज पैकी एक म्हणून दिसली होती. 2005 ला हा शो ‘स्टार वन’ वर दिसायचा. त्यांनंतर 2010 च्या ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये ती जज म्हणूनही दिसली होती. सध्या ती ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या जजिंग पॅनलमध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडतेय.

जवळपास 22 वर्षे झाली मलायका आयटम सॉंग आणि रियालिटी शोज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तिच्या अदा पाहता तिला पाहणाऱ्या पिढ्यांचं वय वाढलं पण तिचं वय वाढलं नसल्याचं बोललं जातं.

इन्स्टग्राम, रिल्स आणि मलायका हे नातं लैच घट्ट व्हायला लागलंय. मलायकाच्या रिल्स बघणाऱ्या पोरांचं म्हणणंय तिच्यामुळे आम्ही रिल्स बघायला शिकलो. सध्या मलायकाची गाणी भेटीला आलेली नाहीत. पण रियालिटी शोमध्ये तिचा डान्स नेहमीच पाहायला मिळतो. त्याच्याही रिल्स खतरनाक असतात…


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in  | All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *