या 5 कारणामुळे टी-२० विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्माकडेच असायला हवं टीम इंडियाचे कर्णधारपद..

या 5 कारणामुळे टी-२० विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्माकडेच असायला हवं टीम इंडियाचे कर्णधारपद..

रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघ सध्या जगातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक आहे, टीम इंडियाचा आयसीसी क्रमवारीत अव्वल संघांमध्ये देखील समावेश आहे, परंतु भारतीय संघासाठी सर्वात वाईट आकडेवारी अशी आहे की या संघाने मागील एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही.

आयसीसी टूर्नामेंटमध्ये टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत प्रवास करते, त्यानंतर टीम फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडते. मागील अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाची अशीच कामगिरी राहिली आहे. म्हणूनच टीम इंडिया मागच्या 12 वर्षापासून विश्वचषक जिंकू शकलेला नाहीये.

रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार का नाही? बीसीसीआय माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितले..

यंदा झालेल्या एकदिवशीय विश्वचषक  स्पर्धेत सुद्धा टीम इंडियाने सर्व लीग सामने जिंकून अजिंक्य स्थान प्राप्त केले मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रोलियाकडून पराभूत होत ट्रॉफी गमवली. रोहित शर्माच्या नेतृत्वात यावेळी टीम इंडिया मैदानात उतरली होती. विश्वचषक जरी भारताने गमावला असला तरी महत्वाचे म्हणजे चाहत्यांचा कर्णधार  रोहित शर्मावरील विश्वास मात्र कमी झालेला नाहीये.

कदाचित त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाच्या लाखो चाहत्यांना रोहितला पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक 2024 मध्ये  टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळताना पाहायचे आहे. रोहितने टीम इंडियाचा कर्णधार पद सांभाळले तरकदाचित टी-२० विश्वचषक तरी भारतीय संघाला जिंकता येईल, असे चाहत्यांचे मत आहे.

त्याच क्रमाने, आज आम्ही अशी 5 मोठी कारणे देखील सांगणार आहोत, जे पाहून असे वाटते की, जर रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवले तर तो टीम इंडियाला आगामी टी-20 विश्वचषक जिंकून देऊ शकतो.

Cricket Records: या भारतीय खेळाडूने डावाची सुरवात करतांना पहिल्याच चेंडूवर मारलेत सर्वाधिक षटकार, अशी कामगिरी करणारा आहे जगातील पहिला फलंदाज..

या 5 कारणामुळे रोहित शर्माला टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार असायला हवे.

 

1.रोहितची कर्णधारपदाची आकडेवारी उत्कृष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहित शर्माच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, टीम इंडियासाठी त्याची आकडेवारी खूपच चांगली आहे. रोहितने आतापर्यंत 35 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने 15 सामन्यात विजय मिळवला, तर 4 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

रोहित शर्मा सध्या T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. हे पाहता, त्याला संघाचा कर्णधार बनवले असते तर तो चांगली कामगिरी करू शकला असता, असे वाटते. जर त्याने विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले तर तो भारतीय संघाला T-20 विश्वचषक जिंकून देऊ शकतो. आयपीएलमध्येही रोहितची आकडेवारी खूप चांगली आहे आणि रोहित मोठ्या सामन्यातील खेळाडूंपैकी एक आहे.

IND vs NZ live: पहिल्या सेमिफायनलमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, ख्रिस गेल ला मागे सोडत केली अशी कामगिरी..

2.मोठ्या सामन्यात रोहितचे जबरदस्त नियंत्रण

जेव्हा-जेव्हा भारतीय क्रिकेट संघ रोहितच्या नेतृत्वाखाली खेळला, तेव्हा रोहितच्या कर्णधारपदाचा जबरदस्त दबदबा या सामन्यात पाहायला मिळाला. रोहित शर्मा कोणत्याही सामन्यात मोठ्या हुशारीने कर्णधार करतो. कधीकाळी भारतीय संघाला सामना जिंकणे कठीण असल्याचे दिसून आले.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक आणि निदाहास करंडक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळल्या आणि दोन्ही ट्रॉफीवर भारताने कब्जा केला. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघ अनेकदा अडचणीत आला असला तरी रोहितने मोठ्या हुशारीने संघाचे नेतृत्व केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, जर आपण रोहितच्या आयपीएलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, तिथेही रोहितने आपल्या संघाला अनेक वेळा महान विजय मिळवून दिले आहेत. तुम्हाला याची जाणीव असेल की रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला दोनदा 1-1 धावांनी ट्रॉफी जिंकून दिली आहे.

3.गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो

कोणत्याही सामन्यादरम्यान, रोहित जेव्हा कर्णधार असतो तेव्हा तो, संघाच्या गोलंदाजीत मोठे बदल करत असतो. रोहित ज्या संघाच्या खेळाडूवर भरवसा ठेवतो तोच संघातील खेळाडू चांगली कामगिरी करत असल्याचे अनेकदा दिसून येते.  रोहित कोणत्याही सामन्यात गोलंदाजांचा आत्मविश्वास कमी होऊ देत नाही. त्याची ही ताकद गोलंदाजांनाही खूप आत्मविश्वास देते. त्यामुळे नेहमीच पुनरागमनाची आशा असते.

रोहित शर्माही उकर्णधार म्हणून टीम इंडियासाठी उत्तम भूमिका बजावत आहे. कोहली कर्णधार असतानाही रोहित संघातील गोलंदाजांशी बोलत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. म्हणूनच कर्णधार मबनून राहण्यास रोहित शर्माचा हा गुण पुरेसा आहे.

४.खेळाडूंना आक्रमक क्रिकेट खेळता येईल.

रोहित शर्मा टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना सर्वात मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे संघातील खेळाडू बचावात्मक क्रिकेट नव्हे तर आक्रमक क्रिकेट खेळू शकतात. कारण रोहितच्या कर्णधारपदाखाली खेळाडूंना त्यांची जागा गमावण्याचा धोका नसल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.

एखाद्या खेळाडूने खराब कामगिरी केली तरीही पुढील सामन्यात त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच, रोहित शर्मा त्याच्या कर्णधारपदाच्या निर्णायक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करतो. अशा परिस्थितीत तो कर्णधार झाला तर संघाला विजय मिळवणे सोपे होऊ शकते.

या 5 कारणामुळे टी-२० विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्माकडेच असायला हवं टीम इंडियाचे कर्णधारपद..

5.नवीन खेळाडू अनुभव घेऊ शकतील.

रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर  इशान किशन, सूर्यकुमार यादव या युवा खेळाडूंचा संघात प्रवेश झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीय टी-२० संघ अधिक मजबूत होऊ शकतो. सूर्यकुमार टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो, जे केवळ रोहितच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वामुळे शक्य झाले, असे स्वतः सूर्या अनेक वेळा म्हणाला आहे.

सूर्यकुमार आणि इशान किशन हे आयपीएल  दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा भाग होते, दोघांनी रोहितच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियामध्ये चमकदार कामगिरी करून संघाला विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले तर आच्छर्य नको वाटायला.

मित्रानो, वरील सर्व कारणांमुळे येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मानेच करावे ,असे सर्वांचें मत आहे. तुम्हाला काय वाटत कमेंट करून नक्की कळवा..


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *