क्रिकेटमधील सर्वांचा लाडका गबरू जवान ‘इरफान पठाण’च्या नावावर असलेले हे विक्रम आजही कोणताच खेळाडू मोडू शकला नाहीये..
नमस्कार मित्रांनो! पूर्वीच्या भारतीय संघात अष्टपैलू व्यक्तिमत्वाने आपली कारकीर्द गाजवलेला अतिशय देखणा असा खेळाडू म्हणजे इरफान पठाण. तो आपल्या डाव्या हाताने जलद गतीने बॉलिंग करायचा. तसेच अनेक वेळा त्याला चाहत्यांनी मोठे सिक्स लावून चांगले रन्स भारतीय संघासाठी काढताना सुद्धा पाहिले आहे. शांत स्वभावाचा, देखना पण अंतःकरणात विजयाची पताका कायम बाळगणारा धडाकेबाज, प्रचंड क्षमता असलेला बॉलर म्हणून पठाण इरफान खूप गाजला. त्यानी काही रेकॉर्ड सुद्धा त्यांच्या नावावर केले. त्याच्या नावावरचा हा रेकॉर्ड तर अनेकांना माहितीच नाही.
आज जरी प्रत्यक्ष संघात इरफान पठाण खेळत नसला तरी त्याच्यावरती प्रेम करणारा, त्याला चाहणारा, त्याच्या समर्थनात उतरणारा, प्रसंगी त्याच्या पाठीशी राहणारा खूप मोठा वर्ग क्रिकेट जगात आहे. भारतीय संघ सोडल्यानंतर म्हणजे भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएल मधल्या केकेआर म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स या संघात सुद्धा इरफान पठाणने दमदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. आपल्याला याची कल्पना असेलच की कोलकाता नाईट रायडर या संघाचा मालक शाहरुख खान आहे. आणि शाहरुख खानचा सुद्धा इरफान वर मोठा भरोसा आहे. वेळोवेळी इरफान त्याच भरवशावर खरा सुद्धा उतरला आहे.

कमी वयातच क्रिकेटला सर्वस्व वाहून दिलेला इरफान एकेका स्पर्धेत स्वतःच्या कौशल्याची चमक दाखवत हळूहळू भारतीय संघाच्या पात्रतेत प्रवेश करता झाला. इरफान भारतीय संघासाठी खेळायला लागला. टी ट्वेंटी, वन डे किंवा टेस्ट अशा सर्वच प्रकारांमध्ये चांगली कामगिरी बजावली. आणि अनेक विजय भारतीय संघाच्या नावावरती नोंदवले. त्याच्या संपूर्ण आयुष्यात तो कधीही कोणासोबत भांडलेला किंवा उद्धटपणाने वागलेला आढळला नाही. युसुफ पठाण हा त्याचा भाऊ आहे. युसूफनेही भारतीय संघासाठी मैदानावरती चांगली कामगिरी केली आहे. हे दोघे भाऊ संघात असले की समोरच्या प्रतिस्पर्धी संघाची फार तारांबळ उडे. युसूफ पठाण हा मोठे सिक्स लावण्यासाठी प्रसिद्ध होता.
View this post on Instagram
इरफान पठाण च्या नावे जो रेकॉर्ड आहे तो आपण आता जाणून घेऊ. हा रेकॉर्ड मागच्या वर्षांपासून कोणीही तोडलेला नाही. वास्तविक पाहता अंडर नाईन्टीन मॅच मध्ये झालेला हा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. इरफान अंडर नाईन्टीन मॅच मध्ये खेळत असताना झीबॉम्बे विरुद्धच्या सामन्यामध्ये इरफान पठाणने हा रेकॉर्ड आपल्या नावाने केला आहे. त्यांनी केवळ 45 रन देऊन तब्बल नऊ विकेट्स एका मॅचमध्ये पटकावले आहे. यावरून त्याच्या क्षमतेचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येतो. त्यानंतर अनेक खेळाडूंनी सुद्धा मोठे विकेट्स आपल्या खात्यात पाडून घेतले आहे. मात्र आज पर्यंत कुणालाही एका मॅच मध्ये नऊ विकेट्स मिळालेल्या नाही. यावरून इरफान पठाणचे कौशल्य, त्याची क्षमता, त्याची शारीरिक क्षमता, त्याचा स्टॅमिना या सर्व गोष्टींचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येतो.
हेही वाचा:
दक्षिण आफ्रिकेला 33 धावांनी पराभूत करून पाकिस्तानने सगळे गणित बिघडवलीत..!
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..