- Advertisement -

भारतीय क्रिकेटचा बॉस सौरव गांगुली यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून विश्वास बसणार नाही , करोडोंच्या संपत्तीचा मालक आणि स्वतःचा फुटबॉल संघ.

0 1

 

 

 

 

आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रात बक्कळ पैसा आहे. पैसा तसेच प्रसिद्धी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळते. इतर लोकांच्या तुलनेत बॉलिवूड आणि क्रिकेटर मधील लोकांचे जीवन आणि जीवनशैली खूप वेगळी असते. महागड्या गाड्या, महागडी कपडे, चैनीच्या वस्तू यामुळे हे लोक सतत चर्चेत असतात. वर्षाला करोडो रुपयांची कमाई करणारे अनेक लोक बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रात आहेत.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याची संपत्ती ऐकून तुम्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. एवढी संपत्ती शिवाय स्वतःचा फुटबॉल संघ सुद्धा आहे तर जाणून घेऊया सौरव गांगुली किती कोटी संपत्तीचे मालक आहेत.

 

भारतीय संघाचे सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून सौरव गांगुली यांना ओळखले जाते. भारतीय संघाचे माजी आक्रमक फलंदाज हे जगभरात प्रसिद्ध आहे. 1998 साली भारतातील अनेक खेळाडूंवर मॅच फिक्सिंग चा आरोप होता शिवाय त्या दरम्यान संघाची स्थिती सुद्धा योग्य न्हवती त्यावेळी तेंडुलकर ने सुद्धा मध्येच कर्णधारपद सोडून दिले. त्यावेळी कर्णधार पद कोणाला द्यायचे हा प्रश्न होता तेव्हा कर्णधार पद हे सौरव गांगुली ने स्वीकारले आणि संघात खेळाडूंची निवड स्वतः करणार ही अट ठेवली क्रिकेट बोर्डाने ती मान्य सुद्धा केली त्यावेळी सौरव गांगुली ने युवा खेळाडूंना संधी दिली.

 

 

सध्या सौरव गांगुली ची गणना ही कोलकत्ता मध्ये सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत होते. कोलकत्ता मधील घरची किंमत ही जवळपास 40 करोड एवढी आहे. 2009 मध्ये सौरव गांगुलीने एक आलिशान डिझायनर घर खरेदी केले, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. याशिवाय गांगुलीने सेंट्रल कोलकाता येथे एक आलिशान बंगला खरेदी केला आहे, ज्याची किंमत 44 कोटी रुपये आहे.

 

क्रिकेट मधून सन्यास घेतल्यानंतर सुद्धा सौरव गांगुली ची फॅन्स मोठ्या प्रमाणात आहेत.सध्या ते Puma, DTDC, JSW Cement, Ajanta Shoes, My11 Circle, Tata Tetley, Acilar Lens, Fortune Oil आणि Senco Gold या ब्रँडचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत आणि त्यामधून ते वार्षिक 6 ते 7 कोटी रुपये कमावतात.

 

 

 

गांगुलीला आलिशान गाड्यांचा शौक आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ CLK 230 (रु. 46.55 लाख), BMW 7-सिरीज (रु. 57 लाख), ऑडी Q5 (55 लाख), BMW X4 (रु. 46 लाख), फोर्ड एंडेव्हर (रु. 4) आहेत. लाख) यासारख्या महागड्या गाड्या आहेत.

 

 

 

गांगुली इंडियन सुपर लीगमधील अॅटलेटिको – डी कोलकाता संघाचा मालक आहे, ज्यामुळे त्याला 24 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. गांगुलीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याचे नेटवर्क 50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 365 कोटी आहे. तसेच वर्षाला BCCI सौरव गांगुली ला 5 कोटी रुपये मानधन सुद्धा देते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.