VIRAL VIDEO:टीम इंडियाची महिला यष्टीरक्षक ‘रिचा घोष’ने डाइव्ह मारत एका हाताने घेतला अविश्वसनीय झेल, पाहून इंग्लंडच्या कर्णधारालाही बसेना विश्वास, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
महिला T20 विश्वचषकाअंतर्गत शनिवारी टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात रेणुका सिंगने शानदार गोलंदाजी करत पहिल्या 3 षटकात 3 विकेट्स घेतल्या. रेणुकाने पहिल्याच षटकापासून गोलंदाजीला धडाकेबाज सुरुवात केली.
तिने तिसऱ्या चेंडूवरच इंग्लिश संघाला मोठा धक्का दिला आणि डॅनी वॉटला खातेही न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विकेटकीपर ऋचा घोषने रेणुकाच्या चेंडूवर एका हाताने असा शानदार झेल घेतला की सर्वच जन हैराण झाले.

एका हाताने उत्कृष्ट डायव्हिंग कॅच..
रेणुकाने पहिल्या षटकातील तिसरा चेंडू टाकताच डेनीने तो रोखण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या काठाला लागला आणि विकेटच्या मागे गेला. येथे, यष्टिरक्षक रिचा घोषने एका हाताने डायव्हिंगचा असा झेल घेतला ज्याने सर्वांनाच थक्क केले. अखेर रिचा घोषच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे वॅटला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. यानंतर रेणुकाने जबरदस्त गोलंदाजी करत तीन षटकात १२ धावा देत ३ बळी घेतले.
टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. शिखा पांडेच्या जागी देविका वैद्यला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते.
पहा व्हिडीओ..
First wicket 🔥#renukasingh #HarmanpreetKaur #T20WorldCup pic.twitter.com/DLIjp10Iei
— Sakshi singh (@Sakshis86972679) February 18, 2023
हे ही वाचा..
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण