आपल्या देशात सर्वात जास्त पैसा हा बॉलिवूड, आणि क्रिकेटर या दोन्ही कडे आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात आणि यांच्या आयुष्यात तसेच जीवनशैली मध्ये मोठा फरक आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सर्वात श्रीमंत क्रिकेट कोण आहेत याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
1) विराट कोहली:-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज तसेच क्रिकेट चा किंग म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते. विराट कोहली हा जगभरात प्रसिद्ध आहे. क्रिकेट मध्ये सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती ही 1053 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर विराट कोहली चा BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये A+ ग्रेडमध्ये समावेश आहे ज्यासाठी त्याला वार्षिक ७ कोटी रुपये इतका पगार मिळतो. त्याचबरोबर आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाकडून खेळण्यासाठी विराट कोहली 15 कोटी रुपये घेतो. त्यामुळे विराट कोहली चे वार्षिक उत्पन्न सुमारे 145 कोटी रुपये एवढे आहे. त्याचबरोबर विराट कोहली कडे महागड्या गाड्या महागडी घरे करोडो रुपयांची फार्म हाऊस सुद्धा आहेत.
रोहित शर्मा:-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा श्रीमंतांच्या यादीमध्ये दुय्यम स्थानी येतो. एका रिपोर्ट नुसार रोहित शर्मा 214 करोड रुपये एवढ्या संपत्तीचे मालक आहेत. रोहित शर्मा ला प्रत्येक साली BCCI कडून 7 करोड रुपये सुद्धा मिळतात. याच शिवाय रोहित शर्मा अनेक ब्रँड्स च्या जाहिराती करून करोडो रुपये कमवतात. तसेच रोहित शर्मा कडे महागडी घरे, Lamborghini URUS, Mercedes-Benz, BMW,Audi या सारख्या महागड्या गाड्या आहेत. तसेच आयपीएल मधून सुद्धा रोहित शर्मा चांगली कमाइ करतात.
रवींद्र जडेजा:-
भारतीय क्रिकेट संघात सर्वात श्रीमंतांच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानी आहे. रवींद्र जडेजा ची क्रिकेट चा प्रवास हा अत्यंत संघर्षमय गेला आहे. एका रिपोर्ट नुसार रवींद्र जडेजा 120 करोड रुपयांचा मालक आहे त्याशिवाय रवींद्र जडेजा अनेक जाहिराती करून करोडो रुपये कमवत आहे. या बरोबर आयपीएल मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. रवींद्र जडेजा कडे महागड्या गाड्या आणि घरे सुद्धा आहेत.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा हा आहे पहिला विदेशी खेळाडू!
हे ही वाचा:- एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारी हे आहेत खेळाडू! वाचा विराटला कोणते मैदान ठरले लकी