रिकी पाँटिंगने जगातील पाच महान T20 खेळाडूंची निवड केली, यादीत 2 भारतीय खेळाडूंचा समावेश.
रिकी पाँटिंगने जगातील पाच महान T20 खेळाडूंची निवड केली, यादीत 2 भारतीय खेळाडूंचा समावेश.
आपल्या देशात दिवसेंदिवस क्रिकेट ची लोकप्रियता वाढताना आपल्याला दिसत आहे. आपल्याकडे अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपल्या देशात इतर खेळ सुद्धा आहेत परंतु आपल्यातील लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत.

आपल्या भारतीय क्रिकेट संघ हा सर्व संघापेक्षा कठीण संघ म्हणून ओळखला जातो. कारण आपल्या भारतीय क्रिकेट संघात असे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांचा क्रिकेट खेळण्यात किंवा फलंदाजी करण्यात कोणीच हात पकडू शकत नाही.
एका मुलाखती मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंगने जगातील सर्व श्रेष्ठ 5 महान T20 खेळाडूंची निवड केली, त्यामध्ये 2 खेळाडू तरी आपल्या भारत देशाचे आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग ने निवडलेल्या पाच टी-20 खेळाडूंमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघातील बाबर आझम, इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलर, अफगाणिस्तानचा रशीद खान यांचा समावेश आहे. त्याने भारताकडून हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या दोन खेळाडूंची निवड केली आहे.
आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये पाँटिंगने भारतीय संघाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचे कौतुक केले आणि त्याला निवडण्यामागचे कारण सांगितले. तो म्हणाला- सध्या फॉर्मात असलेल्या हार्दिक पांड्याला जगभरात प्रसिद्ध आहे. शिवाय गेल्या आयपीएल मध्ये सुद्धा हार्दिक पांड्या ने जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा केली होती.
तसेच जसप्रीत बुमराह बद्दल सांगताना म्हटले की कसोटी आणि एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधला बुमराह हा कदाचित सर्वोत्तम गोलंदाज आहे आणि नवीन चेंडूने तो खूप धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे.
त्यांनी बाबर आझमचे कौतुकही केले. बाबर आझम हा पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वोत्तम फलंदाज आहे शिवाय अनेक वेळा बाबर आझम ने पाकिस्तान संघासाठी अनेक धावा सुद्धा केल्या आहेत.