मी मोडत नाय हो फोडतो….! रिंकू सिंगने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की, थेट स्टेडियमची काचच फोडली; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

मी मोडत नाय हो फोडतो.... रिंकू सिंगने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की, थेट स्टेडियमची काचच फोडली; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

 रिंकू सिंग:  भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून दोन्ही संघात तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला तर दुसरा सामना काल ( 12 डिसेंबर) ला खेळवला गेला. ज्यात टीम इंडियाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

या सामन्यात जरी टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रिंक सिंगने चाहत्यांची मने जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा रिंकू सिंग नावाचे वादळ पाहायला मिळाले. दुसऱ्या सामन्यात रिंकूने शानदार खेळी केली. त्याची फलंदाजी पाहता तो प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळत आहे असे अजिबात वाटत नव्हते.

IND vs SA: सुर्यकुमार यादवने मोडला धोनीचा मोठा विक्रम, दक्षिण आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा ठरला नंबर 1 कर्णधार.

रिंकू सिंगने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की थेट स्टेडियमची काचच फोडली,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

या सामन्यात रिंकू सिंगने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले आहे. या खेळीत रिंकूने 9 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले.

आपल्या या खेळीदरम्यान रिंकूने असा षटकार मारला की मैदानात काच फुटली. त्याच्या या षटकाराचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतोय.

रिंकू सिंगने आपल्या खेळीदरम्यान दोन षटकार मारले असले तरी या दोन षटकारांनी त्याने स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांची मने जिंकली. या षटकारांपैकी एक त्याने असा मारला की ,त्यामुळे स्टेडियममधील मीडिया बॉक्सची काच फुटली. ज्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

हा फोटो पाहून चाहत्यांनी रिंकू सिंगमुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटचे नुकसान झाल्याचे सांगितले. एका यूजरने लिहिले, शांत व्हा, हा फक्त एक ग्लास आहे, रेकॉर्ड तोडणे रिंकू सिंहच्या रक्तात आहे.

Viral Video: रीझा हेंड्रिक्सने अर्शदीप सिंगला मारला एवढा जबरदस्त षटकार की, पाहून भारतीय कर्णधार ही झाला अवाक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

पावसामुळे सामना थांबला तोपर्यंत भारतीय संघाने 7 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रिंकूने 39 चेंडूत 69 धावा केल्या. याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 56 धावांची खेळी केली.

IND vs SA: टीम इंडियाला पाहावे लागले पराभवाचे तोंड..

मी मोडत नाय हो फोडतो.... रिंकू सिंगने ठोकला एवढा जबरदस्त षटकार की, थेट स्टेडियमची काचच फोडली; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात चांगली कामगिरी करत ७ चेंडू राखून विजयासाठीचे लक्ष पूर्ण केले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या (18 DEC) ला खेळवला जाणार आहे.

हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचे दक्षिण आफ्रिकेचे उद्दिष्ट असेल तर दुसरीकडे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मालिका बरोबरीत सोडवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. आता या सामन्यात कोण कोणावर भारी पडेल हे उद्याच स्पष्ट होईल..


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *