- Advertisement -

जाणून घ्या, एका सामन्यासाठी रिंकू सिंगला नेमका किती पगार मिळतो, ऐकाल तर धक्का बसेल, कारण…

0 0

 

आपल्या देशात क्रिकेट आणि बॉलिवूडचे वेड बऱ्याच जणांना आहे. तसेच बॉलिवूड आणि क्रिकेट मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आणि प्रसिद्धी सुद्धा मिळते. आपल्या देशात T20 क्रिकेट चे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात T20 आयपीएल चे सामने सुद्धा सुरू झाले आहेत.

 

आपल्या देशात 31 मार्च पासून आयपीएल च्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला कोलकत्ता नाईट रायडर्स या संघातील स्टार खेळाडू रिंकू सिंग ला कोलकत्ता नाईट रायडर्स संघ किती पगार देतो याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

 

 

गेल्या 2 दिवसांपासून आपल्याला आपल्या देशात एकच नाव ऐकायला मिळते ते म्हणजे रिंकू सिंग. कारण सलग 5षटकार लाऊन कोलकत्ता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून देण्याचे काम रिंकू सिंग ने केले आहे. त्यामुळे अवघ्या 5 बॉल मध्येच रिंकू सिंग आयपीएल चा स्टार खेळाडू बनला आहे.

 

शेवटच्या 5 चेंडू मध्ये सलग 5 षटकार लाऊन रिंकू सिंग ने कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाला विजय मिळवून दिला आहे. अत्यंत आक्रमक फलंदाजी करत रिंकू सिंग ने अविश्वसनीय विजय मिळवून दिला आहे.

 

पाच चेंडूंत कोलकत्ता नाईट रायडर्स संघाला २८ धावांची गरज होती तेव्हा केकेआरचा संघ हा सामना जिंकेल हे कोणालाही स्वप्नातही वाटत नव्हते. पण रिंकू सिंग ने 5 चेंडूत सलग पाच षटकार लावून संघाला विजयी केल.

 

 

केकेआर संघ रिंकू सिंगला एका सामन्यासाठी ४.२३ लाख रुपये एवढा पगार देतात. जर रिंकूने सर्व म्हणजेच १४ सामने खेळले तर त्याला ५६ लाख रुपये मिळतात. त्याचबरोबर जर सामनावीर आणि अन्य पुरस्कार पकडले तर त्याला एका हंगामात किमान सहा लाख रुपये मिळू शकतात. त्यामुळे एका हंगामात किमान ६२ लाख रुपये रिंकूला कमावता येऊ शकतात. परंतु 5अत्यंत कमी पगारात सुद्धा रिंकू ने अविश्वसनीय कामगिरी केली आहे त्यामुळे येणाऱ्या हंगामात रिंकू सिंग ला चांगेल मानधन मिळेल अशी चर्चा सुद्धा होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.