वाघ परतला! दिल्ली कॅपिटल संघाचे कर्णधारपद आता ऋषभ पंत कडे, ऋषभ पंत ची 2024 आयपीएलमध्ये धडाक्यात एन्ट्री,पहा व्हिडीओ..

वाघ परतला! दिल्ली कॅपिटल संघाचे कर्णधारपद आता ऋषभ पंत कडे, ऋषभ पंत ची 2024 आयपीएलमध्ये धडाक्यात एन्ट्री,पहा व्हिडीओ..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

क्रिकेट हा परदेशी खेळ असूनसुद्धा  आपल्या देशातील खेळाडूंनी क्रिकेट मध्ये जगभर दबदबा निर्माण केला आहे .कारण, आपल्या देशातील अनेक दिग्गज खेळाडूंची सारी दुनिया दिवाणी आहे. या मध्ये रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर. क्रिकेटमध्ये आपल्या देशाने अनोखे प्रभुत्व निर्माण केले आहे. आपल्या भारतीय क्रिकेट संघात अशे खेळाडू आहेत ज्यांची तुलना जगातील कोणत्याच खेळाडू सोबत केली जाऊ शकत नाही.

ऋषभ पंत
ऋषभ पंत

आपल्या भारतीय क्रिकेट संघाला सर्वात मोठा फायदा हा आयपीएल T20 सामन्यांमध्ये झाला आहे त्यामुळे क्रिकेट विश्वात अनेक बदल घडून आले आहेत त्यामध्ये महत्वाचे म्हणजे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळून क्रिकेट मधील करियर ला सुरुवात करता आली आहे. 22 मार्च पासून आपल्या देशात आयपीएल T20 च्या नवीन सीजन ला सुरुवात होणार आहे. तर मित्रानो बऱ्याच दिवस चर्चेत असलेले प्रश्न म्हणजे रिषभ पंत ला आयपीएल मध्ये खेळता येईल का? शक्य आहे का या विषयी सविस्तर माहिती तुम्हाला या लेखाच्या द्वारे देणार आहोत.

DC WPL & IPL मध्ये एकदाही नाही जिंकू शकली ट्रॉफी..

WPL T20 सामन्यांमध्ये काय झाले तुम्ही पाहिलेच असेल… अंतिम सामना हा दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन्ही संघामध्ये होता परंतु या वर्षी सुद्धा दिल्ली कॅपिटल संघाला पराभवाला सामोरे जावे लागले हे याच वर्षी नाही तर मागील वर्षी सुद्धा हेच झाले. सलग दोन वर्ष दिल्ली संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे.

त्या पराभवाचा बदला दिल्ली चा पुरुष संघ घेणार आहे आणि यात “सोने पर सुहागा” म्हणजे दिल्ली संघात भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंत परतला आहे. ऋषभ पंत हा कर्णधारपद, फलंदाजी आणि यष्टिरक्षण या मध्ये उत्कृष्ठ आहे. आयपीएल 2024 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या जागी ऋषभ पंत संघाची कमान सांभाळणार आहे.

दिल्ली कॅपिटल VS पंजाब किंग सामन्यापासून होणार दिल्लीची आयपीएल मोहीम सुरु.!

22 मार्च 2024 पासून आयपीएल T20 ला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर 23 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल विरुद्ध पंजाब किंग या दोन्ही संघामध्ये आयपीएल 2024 च्या सीजन मधील दुसरा सामना होणार आहे. गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल सर्वात खाली म्हणजे 9 व्या क्रमांकावर होती. तसेच ऋषभ पंत च्या कॅप्टनसी खाली यंदा च्या वर्षी संघाचा परफॉर्मन्स चांगला राहील.

IPL 2024 ऑक्शन नंतर दिल्ली कॅपिटल अजून मजबूत:

आयपीएल 2024 च्या ऑक्शन नंतर प्रत्येक संघात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. हा बदल दिल्ली कॅपिटल या संघात सुद्धा झालेला आहे. या ऑक्शन मध्ये दिल्ली कॅपिटल संघात शे होप, ट्रिस्टन स्टब्स, जे रिचर्डसन यांसारखे दिग्गज खेळाडू आल्याने संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीची ताकद दुप्पट वाढली आहे. शिवाय संघात ऋषभ पंत चे आगमन सुद्धा झाले आहे त्यामुळे दिल्ली कॅपिटल हा संघ अतिशय मजबूत झाला आहे.

वाघ परतला! दिल्ली कॅपिटल संघाचे कर्णधारपद आता ऋषभ पंत कडे, ऋषभ पंत ची 2024 आयपीएलमध्ये धडाक्यात एन्ट्री,पहा व्हिडीओ..

दिल्ली कॅपिटल संघाची संभावित प्लेइंग XI:-

ऋषभ पंत (कर्णधार), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, एनरिख नॉर्खिया, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद या खेळाडूंचा संघात समावेश असणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *