2023 च्या वर्ल्ड कप मध्ये ऋषभ पंत च्या जागी या 3 खेळाडूंना संधी मिळण्याची शकता, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.
क्रिकेट हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेला दुय्यम स्थानी असलेला खेळ आहे. अनेक दिग्गज खेळाडू प्रत्येक देशाकडे आहेत आणि काही न मोडणारी रेकॉर्ड सुद्धा काही फलंदाजांनी बनवली आहेत.

क्रिकेट मध्ये योग्य करियर करायचे असेल तर प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामन्यात आपला परफॉर्मन्स चांगला ठेवावा लागतो जर का खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर त्याला पुढील सामन्यात संधी मिळत नाहीत हे मात्र खरे आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला 2023 च्या वर्ल्ड कप सामन्यात ऋषभ पंत च्या जागी हे 3 खेळाडू खेळणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात पसरत आहे तर जाणून घेऊया कोण आहेत ते 3 खेळाडू.
केएल राहुल:-
के एल राहुल हा भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज आहे तसेच केएल राहुल हा भारतीय संघाचा एक उत्तम खेळाडू असून तो यष्टिरक्षणही चांगल्या प्रकारे करतो. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघासाठी यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका बजावू शकतो.
संजू सॅमसन:-
संजू सॅमसन हा स्फोटक यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण पंतमुळे त्याला संघात फारशी संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत पंतच्या अनुपस्थितीत त्याला यंदा वर्ल्ड कप मध्ये खेळायची संधी मिळू शकते.
ईशान किशन:-
ईशान किशनने भारतीय संघासाठी अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध चितगाव एकदिवसीय सामन्यातही त्याने द्विशतक झळकावले होते. तो विकेटकीपिंग सुद्धा करतो येणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये ऋषभ पंत च्या जागी ईशान किशन ला संधी मिळू शकते.