दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना ऋषभ पंतचे अनोखे शतक, भेट म्हणून दिली खास जर्सी.!

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना ऋषभ पंतचे अनोखे शतक! भेट म्हणून दिली खास जर्सी.!

 ऋषभ पंत: आयपीएलच्या सतराव्या हंगामात क्रिकेटमध्ये पुनरा आगमन करणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला पहिल्या सामन्यात काही खास कामगिरी करता आले नाही. पंधरा महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या या खेळाडूसाठी दुसरा सामना खूपच स्पेशल होता. दिल्ली कॅपिटल्स कडून त्याने खेळताना हा त्याचा शंभरावा सामना होता. सामना सुरू होण्यापूर्वी त्याला शंभर अंक असलेली जर्सी गिफ्ट म्हणून देण्यात आली. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून 100 सामने खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. ओव्हरऑल 62 वा खेळाडू आहे.

PBKS vs DC: रिषभ पंतची एक चूक पडली दिल्लीला महागात, 17 करोडच्या या खेळाडूने केले दिल्लीचे हाल; पहा व्हायरल व्हिडीओ.

ऋषभ पंत  शंभराव्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल च्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा 12 धावांनी पराभव केला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यांमध्ये ऋषभ पंत 34 धावा काढून बाद झाला. यंदाच्या हंगामामध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतोय. पहिल्या दोन्ही सामन्यात या संघाचा पराभव झाला आहे.

आयपीएल मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. महेंद्रसिंग धोनीने 252, रोहित शर्मा 245, दिनेश कार्तिक 244, विराट कोहली 239 सामने खेळले आहेत. सतराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या यंदाच्या खेळाडूंमध्ये एकाही खेळाडूला 100 सामने खेळता आले नाही. या संघाकडून वीरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, केविन पीटरसन, अमित मिश्रा व डेविड वॉर्नर सारखे अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत.

पंतच्या पूर्वी या संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम लेग स्पिनर अमित मिश्रा यांच्या नावावर आहे. ज्याने या संघाकडून 99 सामने खेळले आहेत. पंतने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 2016 मध्ये त्याने लीग मधील पहिला सामना खेळला होता. 147च्या स्ट्राईक रेटने त्याने 2856 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना ऋषभ पंतचे अनोखे शतक! भेट म्हणून दिली खास जर्सी.!

2023 मध्ये ऋषभ पंत याचा अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होती. त्यामुळे तो क्रिकेटपासून गेल्या 15 महिन्यापासून तो दूर होता. या दुखापतीमुळे तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकला नाही. यंदाच्या हंगामापासून त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. आयपीएल 2024 ही स्पर्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण येत्या जून महिन्यामध्ये भारतीय संघ टी 20 विश्वचषकासाठी वेस्टइंडीज मध्ये जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे जर पंथने आयपीएल मध्ये दमदार कामगिरी केली तर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होऊ शकते.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *