“मी ऋषभ पंत आहे.” रिषभ पंत अपघातात देवासारखा धावून आला हा बस चालक,रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या पंतला चादरीत गुंडाळून नेले दवाखान्यात, या दिलदार बस चालकाचे होतंय सगळीकडे कौतुक, स्वतः पंतने केले त्याच्याबद्दल मोठे वक्तव्य..
भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत कार अपघाताचा शिकार ठरला आहे. या अपघातात तो थोडक्यात बचावला आहे. या अपघातानंतर बस चालकाने सुशील कुमार ने पंत ला गाठले. त्यांनी पंतला हाताळले आणि रुग्णवाहिका बोलावून पंतला रुग्णालयात पाठवले. सुशीलने सांगितले की पंत रक्ताने माखलेला होता आणि त्याने फक्त क्रिकेटपटू ऋषभ पंत असल्याचे सांगितले.
ऋषभ पंत त्याची मर्सिडीज कार स्वतः चालवून त्याच्या गावी रुरकीला जात होता. यादरम्यान त्यांची डोळे मिटले झोपेमुळे आणि कार डिव्हायडर वर आदळली आणि अपघात झाला. पंतने स्वत: सांगितले की, तो विंडो काच तोडून बाहेर आला. यानंतर गाडीला भीषण आग लागली.

पंतसोबत त्याची आईही हॉस्पिटलमध्ये हजर : ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिथे त्याची आईही त्याच्यासोबत आहे. पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा एमआरआयही करण्यात आला आहे. याशिवाय पाठीच्या आणि पायाच्या काही भागात जखमा झाल्या आहेत. पंतचा हा अपघात रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता झाला.
घटनास्थळी उपस्थित बस चालकाने काय सांगितले? : सुशील कुमार यांनी आज एका न्युज चॅनेल ला सांगितले की, ‘मी हरियाणा रोडवेजमध्ये ड्रायव्हर आहे. मी हरिद्वारहून येत होतो. 200 मीटर अगोदर नरसानला पोहोचताच. मला एक कार दिल्लीकडून येताना दिसली आणि ती 60-70 च्या वेगाने डिव्हायडरला धडकली.
धडकल्यानंतर कार हरिद्वार मार्गावर आली. मी पाहिलं की आता बस पण धडकणार. आम्ही कोणालाही वाचवू शकणार नाही. कारण माझे अंतर फक्त ५० मीटर होते. मी ताबडतोब कार सर्व्हिस लाईनवरून काढून पहिल्या लाईनमध्ये ठेवली. ती गाडी दुसऱ्या ओळीत निघाली. माझी गाडी 50-60 च्या स्पीडमध्ये होती. मी लगेच ब्रेक लावला आणि खिडकीच्या बाजूने उडी मारली.
पंतच्या अंगावर कपडे नव्हते, सुशीलने त्याला चादरीत गुंडाळले: बस चालक सुशील म्हणाला, ‘मी तो माणूस (ऋषभ पंत) पाहिला. तो जमिनीवर पडून होता. मला वाटलं तो वाचणार नाही. गाडीतून ठिणग्या निघत होत्या. तो (पंत) त्याच्या बाजूला पडला होता.
#DigitalTalkWithMunish: चश्मदीद ड्राइवर ने ऐसे बचाई पंत की जान
पूरा वीडियो यहां देखें👉https://t.co/gNeJFWEu7z#TimesNowNavbharatOriginals #TNNOriginals #RishabhPantAccident #RishabhPant #DigitalTalk #RishabhPantCarAccident @DevganMunish pic.twitter.com/vO0yF4TYuV
— Times Now Navbharat (@TNNavbharat) December 30, 2022
आम्ही त्याला उचलून गाडीतून दूर नेले. मी त्याला विचारले – अजून कोणीतरी गाडीच्या आत आहे. तो म्हणाला की मी एकटाच होतो. तेव्हा त्याने सांगितले की मी ऋषभ पंत आहे. मला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नाही. त्याला बाजूला उभे केले. त्याच्या अंगावर कपडे नव्हते म्हणून आम्ही त्याला आमच्या चादरीत गुंडाळले.
रिषभ पंतची तब्येत आता स्थिर असून तो डॉक्टरांच्या निगराणीमध्ये आहे. कालच त्याला देहराडून च्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे. बीसीसीआयचे चेअरमन जय शहा यांनी सुद्धा रिषभच्या तब्येतीची विचारपूस करून रिषभचे करीअर असे अर्धवटपणे संपू देणार नसल्याचे म्हटले आहे. चाहते आणि सर्वच क्षेत्रातील लोक तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.