टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये भरती, समोर आले मोठे कारण..
टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये भरती,समोर आले मोठे कारण..
क्रिकेटर ऋषभ पंत च्या कारला अपघात झाला आहे. ऋषभ पंतच्या कारने दिल्लीहून घरी परतत असताना मोठा अपघात झाला. ज्यामध्ये ऋषभ पंत जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुरकीच्या नरसन सीमेवर मोहम्मदपूर झालजवळील वळणावर त्याच्या बीएमडब्ल्यू कारला अपघात झाला. पंतची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घरी परतत असताना त्यांची कार रेलिंगला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत रुरकीहून घरी परतत होता.
Cricketer Rishabh Pant is seriously injured in an accident on Delhi- Roorkee Highway…his car rammed into divider, Risabh Pant shifted to AIIMS Rishikesh#RishabhPant #RishabhPantaccident pic.twitter.com/qQ5XSUKFBr
— Kumar Baldev Mishra (@kumarbaldev26) December 30, 2022
रिषभच्या अपघाताची बातमी समजताच सोशल मिडियावर त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. डॉक्टरांनी रिषभवर उपचार सुरु केले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
डोक्याला आणि पाठीवर घरसटल्यामुळे त्याची जखम बरीच मोठी आहे. रिषभ लवकरात लवकरच यातून बरा होओ, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.