मोठी बातमी: रिषभ पंत बरा नाही झाला तरआयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार पद सांभाळणार हा खेळाडू, स्वतः संघाच्या मालकाने सांगितली पुढची रणनीती..
टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 30 डिसेंबर रोजी अपघाताचा बळी ठरला. त्याच्या गुडघ्यात अस्थिबंधन फाटले आहे आणि त्यातून बरे होण्यासाठी 3-6 महिने लागू शकतात. अशा परिस्थितीत, 25 वर्षीय स्टार यष्टीरक्षक फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतून (IND vs AUS) बाहेर जाऊ शकतो. यानंतर इंडियन प्रीमियर लीग 2023 ) मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. ऋषभ पंतही यातून बाहेर पडला तर दिल्ली कॅपिटल्सचा त्रास वाढेल.
ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा (DC) कर्णधार आहे, त्यामुळे तो IPL 2023 मधून बाहेर पडल्यास फ्रेंचायझीचे नेतृत्व कोण करेल? संघाकडे कर्णधार पद सांभाळू शकेल यासाठी तसे पाहता फारसे पर्याय नाहीत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असून त्याच्याकडे कर्णधारपदाचाही अनुभव आहे. याशिवाय रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, मिचेल मार्श आणि कुलदीप यादव हे काही अनुभवी खेळाडू आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणालाही कर्णधारपदाचा अनुभव नाही.
View this post on Instagram
डेव्हिड वॉर्नरशिवाय दुसरा पर्याय कोण आहे ?
कर्णधारपदाच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाले तर डेव्हिड वॉर्नरमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) कडे सर्वोत्तम पर्याय आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे नेतृत्व देखील केले आहे आणि 2016 मध्ये चॅम्पियन देखील बनवले आहे. याशिवाय सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ हा पर्याय असू शकतो. अंडर-19 विश्वचषक विजेत्या कर्णधाराला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे.
जर रिषभ आयपीएल पर्यंत फीट होऊन मैदानात पोहचला तर याची वेळच येणार नाही मात्र जर तसे झाले नाही तर दिल्लीची पुढची रणनीती काय? असा प्रश्न दिल्ली संघाचे मालक जिंदाल यांनी सांगितले की, तसे पाहता आयपीएलच्या आणखी 3/4 महिने बाकी आहेत. त्यामुळे आम्ही साध्याच नवीन कर्णधार किंवा नवीन रणनीती याबद्दल काहीही विचार केलेला नाहीये. आम्हाला खात्री आहे की, रिषभ तोपर्यंत पूर्णपणे तंदुरस्त होऊन मैदानात दिल्लीचे नेतृत्व करेल.

मात्र न जाने असे काही झाले नाही आणि रिषभ ला संघाच्या बाहेर रहावे लागले तर , आमच्या संघात आणखी असे काही खेळाडू आहेत, जे अतिशय योग्यरीत्या आणि समर्थपणे कर्णधारपदाची जिम्मेदारी पेलवू शकतील. म्हणूनच आम्ही सध्याच याबद्दल विचार करत नसून बेफिक्र आहोत. आम्ही देवाकडे प्रार्थना करू की रिषभ लवकरात लवकर यातू सुखरूप बाहेर येऊन मैदानात पोहचावा..
त्यांच्या बोलण्यावरून एवढे तरी जाणवतंय की, रिषभ जरी आयपीएल साठी फिट नाही झाला तर डेव्हिड वार्नरच्या रूपाने दिल्लीकडे चांगला कर्णधार आहे. आणि भविष्यात रिषभ फिट नाही झाला तर वार्नर संघाचे नेतृत्व करू शकतो..
आयपीएल 2023 साठी असा दिल्ली कॅपिटल्स स्क्वॉड (DC स्क्वॉड) :
ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, मिचेल मार्श, अक्षर पटेल, ललित यादव, अॅनरिक नॉर्टजे, मुस्तफिझूर रहमान, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, चेतन साकारिया, खलील दुबे, प्रवीण अहमद , कमलेश नागरकोटी, विकी ओस्तवाल, अमन खान, रिले रोसौ, मनीष पांडे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि फिल सॉल्ट.