आयपीएल 2023 नाही खेळला तरीही रिषभ पंतला मिळणार एवढे कोटी, बीसीसीआयच्या या नियमामुळे दिल्ली कॅपिटल्सला रिषभला द्यावे लागणार एवढे कोटी रुपये..
30 डिसेंबर 2022 रोजी, भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा रुरकीजवळ पहाटे 5.30 वाजता एक भीषण अपघात झाला. बसचालकाने त्यांची सुटका केली. मात्र, पंतची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याचवेळी, त्याच्या चांगल्या उपचारांसाठी, बीसीसीआयने त्याला मुंबईला हलवले होते जिथे त्याच्या अस्थिबंधनाचे यशस्वी ऑपरेशन झाले. दरम्यान, या स्टार खेळाडूबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
ऋषभ पंतला ज्या प्रकारे दुखापत झाली आहे, त्यामुळे तो जवळपास 6 किंवा 7 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. आयपीएल 2023 मधूनही तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या चांगल्या उपचारांसाठी, बीसीसीआयने त्याला डेहराडूनहून मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हलवले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अपघातादरम्यान पंतच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता, त्यानंतर त्याच्यावर सुमारे 3 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, या युवा फलंदाजाबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
ऋषभ पंत आयपीएल 2023 मधून बाहेर राहणार हे निश्चित आहे. दरम्यान, बीसीसीआयने पंतला या मोसमाची संपूर्ण रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सकडून पूर्ण 16 कोटी मिळतील. यासोबतच या युवा खेळाडूला बोर्ड संपूर्ण केंद्रीय कराराचे वेतन देणार आहे. अशा परिस्थितीत पंतला आयपीएल 16 कोटी आणि केंद्रीय करार 5 कोटी मिळून एकूण 21 कोटी रुपये मिळतील.
दिल्लीच्या संघामालकांची इच्छा नसेल तरीही द्यावे लागणार पैसे?
तर आयपीएल संघाबाबत बीसीसीआयने एक करार केलेला आहे ज्यानुसार बोली लावून संघात दाखल केलेल्या खेळाडूला त्या हंगामात काही अडचण येऊन तो आयपीएलमध्ये सहभागी नाही होऊ शकला तर त्याला त्याच्यावर लावलेली बोली त्याची फीस म्हणून द्यायची का नाही? याचा प्राथमिक निर्णय जरी संघमालक घेतअसले तरीही अपघात किंवा इतर वाईट वेळेनुसार जर त्या खेळाडूचे बीसीसीआय तर्फे इन्शुरन्स काढलेले असेल तर बीसीसीआय स्वतः केंद्रीय करारातील फीस तर देतेच शिवाय आयपीएल संघाला सुद्धा त्यांची फीस देण्याची सक्ती करू शकते, हा निर्णय बीसीसीआयकडे राखीव असल्यामुळे आता दिल्लीच्या मालकांना सुद्धा या निर्णयाचे पालन करून रिषभची फीस द्यावी लागणार आहे.
पंतला या दुखापतीमधून सावरायला काही महिने लागतील. तो सुमारे सहा ते आठ आठवडे रुग्णालयात असेल आणि त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च बीसीसीआय उचलणार आहे.
पंत मैदानावर कधी परतणार?
विशेष म्हणजे ऋषभ पंतला ज्या प्रकारे दुखापत झाली आहे, त्यामुळे तो जवळपास 6 ते 7 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. यामुळे तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि आयपीएल 2023 पासून दूर राहणार आहे. त्याचवेळी, तो 6 महिन्यांत परतला नाही, तर त्याला 2023 चा विश्वचषक खेळणे कठीण होऊ शकते. मात्र, मध्यंतरी अशी बातमी आली होती की पंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून पुनरागमन करू शकतो पण हे शक्य होईल असे वाटत नाही.
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: