अपघातानंतर पहिल्यांदाच ऋषभ पंतने स्वतः केली सोशल मिडीयावर पोस्ट, तब्येतीबाबत दिली मोठी अपडेट, पहा नक्की काय म्हणाला पंत?

अपघातानंतर पहिल्यांदाच रिषभ पंतने स्वतः केली सोशल मिडीयावर पोस्ट, तब्येतीबाबत दिली मोठी अपडेट, पहा नक्की काय म्हणाला रिषभ?
भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. कार अपघातानंतर पंतने पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट लिहून चाहते, सहकारी खेळाडू आणि डॉक्टरांचे आभार मानले. ऋषभ पंतने लिहिले की, तो आगामी आव्हानासाठी तयार आहे.
ऋषभ पंतने ट्विटरवर लिहिले… चाहते, सहकारी खेळाडू, डॉक्टर आणि फिजिओ यांच्या समर्थन आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली, मी बरे होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि पुढील आव्हानांसाठी सज्ज आहे.

ऋषभ पंत 30 डिसेंबर रोजी कार अपघातात जखमी झाला होता. दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. डेहराडूनमधील उपचारानंतर पंतला मुंबईत आणण्यात आले, जिथे पंतच्या गुडघ्याच्या अस्थिबंधनाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
आता सहा आठवड्यांनी दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो किमान 18 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. तो यंदाच्या आयपीएलचा भागही असणार नाही, याशिवाय वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातही तो सहभागी होण्याची शक्यता नाही.
From the bottom of my heart, I also would like to thank all my fans, teammates, doctors and the physios for your kind words and encouragement. Looking forward to see you all on the field. #grateful #blessed
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 16, 2023
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…