” जराही माणुसकी नाहीये का?” रिषभ पंतला मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईत आणण्यासाठी रुग्णवाहिकेत टाकतांना पत्रकारांनी केले असे काम की भडकली पंतची बहिण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
” जराही माणुसकी नाहीये का?” रिषभ पंतला मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईत आणण्यासाठी रुग्णवाहिकेत टाकतांना पत्रकारांनी केली अशी हरकत की भडकली पंतची बहिण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, अपघातानंतर लगेचच त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डिव्हायडरला धडकल्यानंतर कारने पेट घेतला. पण, सुदैवाने, त्यावेळी तो कारमधून बाहेर पडला होता.
त्यानंतर त्यांना चांगल्या उपचारासाठी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची बातमी आली. डॉक्टरांनी सांगितले की,पंतच्या डोळ्याच्या वर 2 कट आहेत, पाठीची त्वचा खराब झाली आहे आणि पायाला सुद्धा गंभीर मार आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी जेव्हा त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून चांगल्या उपचारांसाठी मुंबईला हलवले जात होते. तेथे मीडियावाल्यांची गर्दी पाहून ऋषभच्या बहिणीचा संयम सुटला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतच्या चांगल्या उपचारांसाठी, त्याला डेहराडूनहून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेथे ते बीसीसीआयच्या डॉक्टरांच्या थेट देखरेखीखाली असतील. पंतला खोलीतून बाहेर आणताच मीडिया कर्मचार्यांनी क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलचा परिसर घेराव केला.
त्याचवेळी पंत यांची बहीण साक्षी पंत यांनी रुग्णवाहिकेच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांवर आरडाओरडा केला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपला संयम गमावून ती म्हणाली, “इंसानीयत नही है क्याआप मे?.” ऋषभ पंतच्या उजव्या गुडघ्याला लिगामेंट फाटले आहे आणि उजव्या हाताच्या मनगट, घोट्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर ऋषभ पंतवर डेहराडूनमध्ये उपचार सुरू होते.
पंतला (ऋषभ पंत) नवीन वर्षाचे सुरवातीचे दिवस त्याच्या आई आणि बहिणीसोबत घालवायचे होते. त्यामुळे तो रात्रीच कारने घरी जात होत यावेळी तो स्वतः कार चालवत होता. पण, त्याच दरम्यान त्याचा एक वेदनादायक अपघात झाला. त्याच्या बीएमडब्ल्यू कारलाही आग लागली.
कारला आग लागल्याचे पाहून सुशील आणि परमजीत नावाच्या दोघांनी त्याला कारमधून बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात पाठवले. त्यानंतर तेथून त्याला डेहराडूनला रेफर करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतला लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याला शक्य ती सर्व मदत केली जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “ऋषभ पंत टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या उपचाराचा सर्व खर्च बीसीसीआय उचलणार आहे.