Rishabh Pant Viral Six Video: रिषभ पंतने मारला एवढा जबरदस्त षटकार की थेट कॅमेरामन झाला जखमी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…!

Rishabh Pant Viral Six Video: रिषभ पंतने मारला एवढा जबरदस्त षटकार की थेट कॅमेरामन झाला जखमी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल...!

Rishabh Pant Viral Six Video:  IPL 2024 मधील 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात खेळला गेला. दिल्लीने हा सामना 4 धावांनी जिंकला. या सामन्यात रिषभ पंतने कर्णधारपदाला साजेल अशी तडाखेबाज खेळी खेळली. या सामन्यात पंतने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली होती. विशेषत: शेवटच्या षटकात पंतने मोहित शर्माला  ज्या पद्धतीने फटके मारलेत्यामुळे संघाची धावसंख्या 200 पार झाली. मात्र या सामन्यात रिषभ पंत फलंदाजी करत असतांना एक कॅमेरामन जखमी झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

Rishbh Pant- yuvakatta News
xr:d:DAFh899KyNM:4510,j:4516409190452738889,t:24041218

Rishabh Pant Viral Six Video:  रिषभ पंतच्या षटकाराने कॅमेरामन जखमी झाला.

How to Make perfect Team on Dream 11: ड्रीम 11 वर टीम बनवण्यासाठी या 5 टिप्स नक्की वापरा, तुमची टीम नक्कीच होईल टाॅपर..!

दिल्लीची फलंदाजी सुरू असताना मोहित शर्माने गुजरातच्या डावातील शेवटचे षटक टाकले. या षटकात पंतने मोहितला वाईट पद्धतीने मारले होते. या षटकात मोहितने 31 धावा दिल्या होत्या. पंतने या षटकात सलग तीन षटकार ठोकले होते.  रिषभ पंतच्या याच षटकाराने कॅमेरामन जखमी झाला. त्यानंतर पंतला हे समजले आणि दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने कॅमेरामनसाठी एक खास व्हिडिओ शेअर करून सामन्यानंतर माफी मागितली.

DC vs GT: पंतने तुफानी खेळी खेळली.

रिषभ पंतने गुजरात टायटन्सविरुद्ध झंझावाती अर्धशतक झळकावले. पंतने 43 चेंडूत 88 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत पंतने 5 चौकार आणि 8 शानदार षटकार मारले. या काळात पंतचा स्ट्राइक रेट 204 राहिला आहे. आयपीएल 2024 मधील हे तिसरे अर्धशतक होते. आता पंतही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उतरला आहे. आता आयपीएल 2024 मध्ये पंतने 9 सामन्यात 342 धावा केल्या आहेत. या मोसमात पंतच्या बॅटमधून 27 चौकार आणि 21 षटकार आले आहेत.

Rishabh Pant Viral Six Video: रिषभ पंतने मारला एवढा जबरदस्त षटकार की थेट कॅमेरामन झाला जखमी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल...!

गुजरात टायटन्सचा पराभव केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सलाही पॉइंट टेबलमध्ये एक फायदा झाला आहे. दिल्लीचा 9 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे. याशिवाय पंतच्या संघाने 5 सामने गमावले आहेत. आता दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *