अपघातानंतर पहिल्यांदाच रिषभ पंत क्रॉचेस न वापरता स्वतःच्या पायवर उभा राहिला, दिग्गज खेळाडूंचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पंतचे नुकतेच काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात तो क्रॉचेस फेकून स्वतःच्या पायावर चालताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो टेबल टेनिस खेळताना दिसत होता. यादरम्यान पंत खूपच फिट दिसत आहे. याआधी, इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्सच्या निवडक सामन्यांमध्ये पंत क्रॅचच्या सहाय्याने चालताना दिसला होता, परंतु चॅम्पियन स्वतःच्या जोरावर चालताना दिसण्याची ही अपघातानंतरची पहिलीच वेळ आहे.

पंतने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले- “हॅपी नो मोअर क्रचेस डे!” साहजिकच पंत हा आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि क्रॅचशिवाय चालत आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने कमेंट अॅक्शनमध्ये व्हिडिओवर इमोजी पोस्ट करून प्रतिक्रिया दिली. तर भारताचा माजी गोलंदाज श्रीशांतने लिहिले- “लव्ह यू भाऊ… विश्वास ठेवा.” दरम्यान सूर्यकुमार यादव यांनी लिहिले, Spidey is back! तुम्हाला अधिक शक्ती.
View this post on Instagram
गेल्या वर्षी रिषभ पंतचा झाला होता मोठा अपघात..
स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. जानेवारीमध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यापासून, पंत त्याच्या दुखापतीबद्दल चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत चित्रे आणि व्हिडिओ अपलोड करत आहे. आयपीएलदरम्यान, गेल्या महिन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध कॅपिटल्सच्या सामन्यात पंत दिसला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाच्या प्रशिक्षण सत्रातही तो उपस्थित होता. पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे.
हेही वाचा: