हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा भारताचा ‘मिस्ट्री स्पिनर’ घेतोय लंकेच्या फलंदाजांचा सराव,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

मिस्ट्री स्पिनर

 

भारतात सुरू असलेल्या तेराव्या विश्वचषक स्पर्धेत एकूण दहा संघ सामील झाले आहेत. प्रत्येक संघ विश्वचषकावर आपले नाव करावे यासाठी जीव तोडून मेहनत घेतोय. काही संघ विजय मिळवण्यासाठी इथल्या टेक्निकचा आधार घेत आहेत. तर काहीजण आजी- माजी खेळाडूंच्या सखोल मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याला मेंटॉर म्हणून संघासोबत जोडले आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ एस श्रीराम याच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. तर काही संघ इथल्या लोकल युवा खेळाडूंचा आधार घेत सराव करत आहेत. असंच एक तरुण लोकल खेळाडू सध्या चर्चेत आलाय.  नक्की कोण आहे तो खेळाडू आणि का त्याची एवढी चर्चा होतेय. सविस्तर जाणून घेऊया..

भारताचा लोकल मिस्ट्री स्पिनर देतोय श्रीलंकेच्या फलंदाजांना सरावाचे धडे.

ban vs afg: आज बांग्लादेशचा कर्णधार 'शाकिब अल हसन'कडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी, विश्वचषकातील आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू होणार?

भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा एक युवक रांची शहर सोडून दिल्लीत लंकेच्या फलंदाजांचा सराव घेतोय. हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा हा 20 वर्षीय तरुण आपल्या फिरकी गोलंदाजांनी साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. लंकेच्या नेट सेशनमध्ये तो आपल्या गोलंदाजीवर फलंदाजांचा सराव घेतोय.

रितेश’ असे या प्रतिभावान खेळाडूचे नाव आहे. रितेश हा मूळचा रांचीचा असून सध्या तो दिल्लीमध्ये वास्तव्यास आहे. त्याचे आई-वडील रांची मध्ये भाजीपाला विकण्याचे काम करतात. बारावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या रितेशला झारखंडमध्ये स्कॉलरशिप मिळत होती. ती बंद झाल्याने तो दिल्लीत येऊन हॉटेलमध्ये वेटरचे काम करू लागला. दिवसभर क्रिकेट खेळून आणि रात्रभर वेटरचे काम करायचे असा त्याचा दिनक्रम.

दरम्यान, श्रीलंकेचा संघ लेजेंड्स क्रिकेट लीगसाठी भारतात भारतात आला होता, तेव्हा श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या आणि तिलकरत्ने दिलशान हे त्याची फिरकी गोलंदाजी पाहून प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी त्याला श्रीलंका संघ जेव्हा विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येईल तेव्हा तो त्यांच्या संघासोबत रहावे, अशी विनंती देखील केली. सनत जयसूर्या आणि तिलकरत्नेची ही ऑफर रितेशने लगेचच स्वीकारली.

मिस्ट्री स्पिनर

श्रीलंकाचा संघ दिल्लीमध्ये दाखल होताच, त्यांनी आयसीसीकडे रितेशला संघासोबत जोडण्याविषयी परवानगी मागितली. पण आयसीसीने ती परवानगी नाकारली. त्यानंतर श्रीलंका संघाने डीडीसी कडे रितेशला आपल्या सोबत जोडण्याविषयी परवानगी मागितली. त्यानंतर त्यांनी ती परवानगी दिली.

सध्या ‘रितेश’ अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघाच्या नेट सेशन वेळी गोलंदाजी करतोय. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा संघ जोपर्यंत दिल्लीमध्ये आहेत तोपर्यंत रितेश त्यांच्यासोबत असणार आहे. युवा फिरकीपटू रितेश सध्या हरियाणाचा क्रिकेटपटू मनविंदर सिंग बिसला याच्या अकॅडमीत खेळतोय. रितेश च्या गोलंदाजी कौशल्याला चांगली दिशा मिळाली तर लवकरच तो आपल्याला आयपीएल आणि नंतर टीम इंडियामधेही खेळतांना दिसू शकतो.


हेही वाचा:

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत